दिल्ली सरकारने मंजूर केले नवीन विधेयक (फोटो- सोशल मीडिया)
दिल्ली सरकारने मंजूर केले नवे बिल
सार्वजनिक जन विश्वास सुधारणा विधेयक मंजूर
व्यावसायिकांना निर्भीडपणे काम करता येणार
दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्हे गुन्हेगारीमुक्त करणे असा यामागचा उद्देश्य असल्याचे म्हटले जात आहे.
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्हे गुन्हेगारीमुक्त करणे असा यामागचा उद्देश्य असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे त्याचे रूपांतर दिवाणी शिक्षेत करणे असे आहे. याचा हेतु सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना कायदेशीर अडचणीशिवाय काम करणे सोपे व्हावे.
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदन जारी केले आहे. या विधेयकामुळे व्यापार करणे सोपे होणार आहे. सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ होणार आहे. लहान नियमांचे उल्लंघन केल्याने आता फौजदारी खटले दाखल केले जाणार नाहीत. यामुळे कोर्टवरील ताण देखील भार कमी होणार आहे.
मंजूर करण्यात आलेले विधेयक 5 जानेवारी रोजी हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. या विधेयकांत औद्योगिक विकास कायदा, दिल्ली जल बोर्ड कायदा, दिल्ली कृषी विपणन कायदा आणि अन्य महत्वाचे कायदे समाविष्ट करण्यात आले आहेत. आता यानुसार किरकोळ गुन्हे केलेल्या व्यक्ती फौजदारी कारवाई ऐवजी दंडाच्या शिक्षेस पात्र असणार आहेत.
राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली
राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या कमी होताना दिसत नाही. रविवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट श्रेणीत नोंदवली गेली. त्याआधी शनिवारीही हवेची गुणवत्ता खूपच खराब राहिली. रविवारी सकाळी राजधानीत धुक्याची जणू चादरच पसरली होती. ज्यामुळे दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली. दिल्लीसाठीच्या एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीमनुसार, अनेक भागात AQI ४०० च्या वर नोंदवला गेला, जो अत्यंत वाईट श्रेणीत येतो.
विषारी धुक्याच्या थराने आनंद विहार परिसरात व्यापला आहे, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानीवर परिणाम झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, आनंद विहारमधील हवेची गुणवत्ता निर्देशांक ४४५ नोंदवला गेला होता, जो गंभीर श्रेणीत येतो. चांदणी चौकात AQI ४१५, द्वारका ४०४, आयजीआय विमानतळ परिसरात ३२१, आयटीओ ४०३ आणि विवेक विहारमध्ये ४२८ नोंदवले गेले.






