Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : रस्त्यांची दुरावस्था ठरतेय मृत्यूचं कारण; धुळदेव गावच्या हद्दीत Alto कारचा अपघात

माण तालुक्यातील म्हसवड शहरालगच्या धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2026 | 02:23 PM
Satara News : रस्त्यांची दुरावस्था ठरतेय मृत्यूचं कारण; धुळदेव गावच्या हद्दीत Alto कारचा अपघात
Follow Us
Follow Us:
  • रस्त्यांची दुरावस्था ठरतेय मृत्यूचं कारण;
  • धुळदेव गावच्या हद्दीत Alto कारचा अपघात
म्हसवड, माण तालुक्यातील म्हसवड शहरालगच्या धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी झालेल्या भिषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना सातारा येथील डॉ. क्रांतिसिह रुग्णालयात म्हसवड पोलीसांनी पाठवले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सातारा ( कोडोली) येथील निकम कुटुंब हे देवदर्शनासाठी सातारा येथून पंढरपुरला आपल्या आल्टो या चारचाकी वाहनाने निघाले होते, त्यांचे वाहन सकाळी ९ नंतर म्हसवड येथून पंढरपुरकडे निघाले असता पुढे असलेल्या धुळदेव गावच्या हद्दीत त्यांची आल्टो कार ही आली असता त्या ठिकाणी रस्ता उखडलेला असल्याने रस्त्याचा अंदाज आल्टो चालकास न आल्याने अचानक ब्रेक्स दाबल्याने आल्टो कार ने तीन ते चार पलट्या खाल्या यामुळे झालेल्या अपघातामुळे आल्टोमधील दोन जण जागेवर ठार झाले तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या अपघाताची खबर धुळदेव गावात अनेक ग्रामस्थांनी समजताच अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत म्हसवड पोलीसांना याबाबत कळवले, सदर अपघाताची माहिती मिळताच पो. कॉ. अभिजीत भादुले, पो.ना. लुबाळ व पो. हवा. हांगे हे तात्काळ घटनास्थळावर पोहचले, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १०८ या – रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना म्हसवड येथील संचित रुग्णालयात आणले त्याठिकाणी जखमींवर प्राथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सातारा येथील डॉ क्रांतिसिह रुग्णालयात पाठवले.

Satara News : रस्त्यांची दुरवस्था आणि भरधाव वाहनांचा कहर; भीषण अपघाताने कराड हादरलं

रस्त्याचे काम रखडल्याने अपघाताची मालिका
दरम्यान सदर अपघातामुळे धुळदेव ग्रामस्थ अधिकच आक्रामक झाले असून या अपघातास प्रशासनच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, सातारा ते सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग असून धुळदेव गावच्या हद्दीतच या रस्त्याचे काम गत ८ वर्षापासून रस्ते विकास महामंडळाकडून रखडवण्यात आले आहे, सदरचे काम पुर्ण करावे यासाठी आजवर येथील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने करुन प्रशासनाला याचा जाब विचारला आहे, मात्र प्रशासनाने त्यांची फक्त बोळवणच केल्याने अपघातांची मालिका येथे आज ही सुरु असुन आजवर जवळपास २० जणांना याठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे, तर आजवर जवळपास ३०० हुन अधिक छोटे – मोठे अपघात याठिकाणी झाले असुन आणखी कितीजणांचा जीव गेल्यावर प्रशासनाला या रस्तेकामी जाग येणार असा संतप्त सवाल घुळदेव ग्रामस्थानी व्यक्त केला आहे.

आणखी एक अपघात पती – पत्नी गंभीर
सातारा-लातूर या राष्ट्रीयमार्गावरील माण तालुक्यातील पळशी फाटा परिसरात खराब आणि धोकादायक रस्त्यामुळे आणखी एक गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सविता शेळके (वय ४७) आणि रामचंद्र शेळके (वय ५२, मूळ गाव माळशिरस, सध्या रा. सातारा) है कामानिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आहेत, ते आपल्या गावी माळशिरस येथे जात असताना माण तालुक्यातील पळशी फाटा येथे रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला. त्यांची गाडी घसरून अपघात झाला, यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जयप्रकाश अवघडे या युवकाने तत्परता दाखवत जखमीना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Sangali News : अनधिकृत बांधकामावर हातोडा; झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई

Web Title: Poor condition of roads is the cause of death alto car accident within dhuldev village limits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
2

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
3

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
4

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.