जनता बाजार परिसरात डंपरच्या धडकेत प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू
शहरातील जनता बाजार परिसरात कराड-विटा मार्गावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात सुषमा आनंदा किर्तने (वय 54,. गजानन हौसिंग सोसायटी, कराड) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या सैदापूर (विद्यानगर) येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या.
कराड शहरात नागरिकांमध्ये भीती संताप; उपाययोजनांची मागणी
एका दिवसात तीन अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने कराड शहरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई, वाहतूक नियंत्रणाची कडक अंमलबजावणी आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
पोलिसांनी डंपरसह चालकाला घेतले ताब्यात तणावाचे वातावरण
महाविद्यालय सुटल्यानंतर त्या दुचाकीवरून बसस्थानकाच्या दिशेने जात असताना दगडांनी भरलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर डंपरने त्यांना काही अंतर फरफटत नेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने डंपर घटनास्थळी सोडून पलायन केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी डंपर ताब्यात घेतल्यानंतर तो पोलीस ठाण्यात नेताना वाटेत त्यातील दगड उत्तरविण्यात आल्याचे समोर आल्याने संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले आहे.






