Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : विधानसभा उपाध्यक्षपदासाठी ‘या’ तीन नेत्यांची नावं चर्चेत; अण्णा बनसोडे यांचं नाव आघाडीवर…

2009 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2019 आणि 2024 असे सलग दोनवेळा त्यांनी पुन्हा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या पाठीशी राहिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 25, 2025 | 11:38 AM
विधानसभा उपाध्यक्षपदासाठी 'या' तीन आमदारांची नावं चर्चेत; अण्णा बनसोडे यांचं नाव आघाडीवर...

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी 'या' तीन आमदारांची नावं चर्चेत; अण्णा बनसोडे यांचं नाव आघाडीवर...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचे सरकार सध्या सत्तेवर आहे. असे असताना आता महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात आमदार अण्णा बनसोडे, लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावं चर्चेत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आज दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

बनसोडे हे पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. 2009 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2019 आणि 2024 असे सलग दोनवेळा त्यांनी पुन्हा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या पाठीशी राहिले आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडूनही आले. दादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरीचे ते भक्कम शिलेदार मानले जातात.

विधानसभा विरोधी पक्षनेता अद्याप ठरेना

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांची निवड केली जाईल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती.  पण, अधिवेशन अखेरच्या टप्प्यात असूनही अद्याप या निवडीला मुहूर्त न मिळाल्याने सोमवारी विधानसभेत याचे पडसाद उमटले. ही निवड तातडीने करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.

Web Title: Possibilities of anna bansode to become dy speaker of maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Anna Bansode
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
1

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
3

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
4

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.