Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दहावा हफ्ता आता…

निवडणुकीपूर्वी 1500 रुपये प्रति महिना दिल्यानंतर आता 2100 रुपये देऊ असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप याबाबत हालचाली झालेल्या नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2025 | 07:06 AM
अक्षय्य तृतीयेला दहावा हप्ता पडण्याची शक्यता

अक्षय्य तृतीयेला दहावा हप्ता पडण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फायदाही झाल्याचे दिसून आले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात पडले असून, दहाव्या हफ्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे.

निवडणुकीपूर्वी 1500 रुपये प्रति महिना दिल्यानंतर आता 2100 रुपये देऊ असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप याबाबत हालचाली झालेल्या नाहीत. त्यातच सरकारमधील नेते नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीही म्हटलेच नसल्याचे झिरवाळ यांनी नुकतेच म्हटले होते. दरम्यान, अक्षय्य तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिल रोजी दहावा हफ्ता खात्यात पडणार असल्याचे बोलले जात आहे.

जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर मार्चचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला होता. तर आता एप्रिलचा हप्ता अक्षय्य तृतीयेला मिळणार आहे. दरम्यान, शासनाकडून योजनेचे निकष कडक पद्धतीने राबविले जात असल्याने लाभार्थी संख्येत आणखी घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

अर्जांची केली जातीये पुनर्तपासणी

प्रत्येक जिह्यात महिला व बालविकास विभागाकडून अर्जाची पुनर्तपासणी केली जात आहे. आतापर्यंत राज्यात 11 लाख लाडक्या बहिणी यासाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. महिलांची नावे वगळण्यात येत असल्याने दर महिन्यात यातील लाभार्थी आकडे बदलत आहेत. तर संभाजीनगर जिल्ह्यात ९ लाख ३२ हजार २५० महिला या योजनेसाठी सध्या लाभ घेत आहेत.

2100 रुपयांची प्रतीक्षाच

विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारने ही रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम वाढविण्यात येईल, असे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. यासाठी लाभार्थी महिलांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

1500 की 500 रुपये?

शासकीय योजनांचा आर्थिक लाभ मिळवणाऱ्या महिलांना ५०० रुपये देण्याबाबतही कार्यवाही सुरु झाली आहे. ज्या महिलांना शेतकरी सन्मान योजनेंतर्गत वर्षाला 12 हजार मिळतात, त्यांना आता लाडकी बहीण योजनेत 500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Web Title: Possibility of getting the tenth installment of ladki bahin yojana on akshaya tritiya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 07:01 AM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • Maharashtra Government Scheme

संबंधित बातम्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
1

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

राज ठाकरेंच्या ‘तिसऱ्या मुंबई’वरील टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; ‘काय करायचं हे ठरलंय, नियोजनही सुरू’
2

राज ठाकरेंच्या ‘तिसऱ्या मुंबई’वरील टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; ‘काय करायचं हे ठरलंय, नियोजनही सुरू’

कर्जमुक्तीचे १७५ कोटी ७८ लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त; २३ हजार ५०८ शेतक-यांचा समावेश
3

कर्जमुक्तीचे १७५ कोटी ७८ लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त; २३ हजार ५०८ शेतक-यांचा समावेश

Maharashtra Govt News: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; जिहाद आणि कट्टरतावादाला खतपाणी घालणाऱ्या ११४ साहित्यांवर बंदी
4

Maharashtra Govt News: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; जिहाद आणि कट्टरतावादाला खतपाणी घालणाऱ्या ११४ साहित्यांवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.