Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: सभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग! महाजनांच्या दरबारी इच्छुकांची हजेरी; कोणाचे नशीब उजळणार

सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपात महापौर, उपमहापौर व स्थायी या महत्वाच्या पदांसाठी इच्छूकांची संख्या अधिक होती. त्यातही शिंदे सेनेला उपमहापौरपद देण्यात आले, त्यामुळे पक्षातील इच्छूकांना मुरड घालावी लागली.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 25, 2026 | 06:00 PM
Prabhag Sabhapati Election 2026, BJP Ward Committee Chairperson, Girish Mahajan

Prabhag Sabhapati Election 2026, BJP Ward Committee Chairperson, Girish Mahajan

Follow Us
Follow Us:

 

  • नाशिक महानगरपालिकेच्या सहाही विभागांच्या प्रभाग सभापतींची निवडणूक गुरुवारी (३० एप्रिल) सकाळी १० ते सायंकाळी ५:३० या वेळेत स्थायी समिती सभागृहात पार पडणार आहे.
  • महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रस्तावानंतर विभागीय आयुक्तांनी या निवडणुकीला मान्यता दिली असून, अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया राबवली जाईल.
  • महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींच्या निवडीनंतर आता प्रभाग सभापती पदासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या स्तरावर फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
Nashik News: महपालिकेच्या सहाही प्रभागाच्या प्रभाग सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर घोषीत करण्यात आला असून, येत्या गुरूवारी (दि.३०) सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मनपाच्या स्थायी समिती सभागृहात प्रभागातील नगरसेवकांच्या बैठकीत ही निवड करण्यात येणार आहे. या निवडीचा कार्यक्रम घोषीत होताच सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये सभापतीपदासाठी फिल्डींग लावण्यास सुरूवात झाली आहे. महापालिकेची जानेवारीत निवडणूक झाल्यानंतर महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापतींची निवड प्रकीया पार पडली.

प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी केल्यानंतर पक्षीय बलाबल निश्चित झाल्यानंतर प्रभाग सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे परवानगी व वेळ मिळावी यासाठी मनपाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला असून, आयुक्तांनी दिलेल्या अनुमतीनंतर गुरूवारी (दि.३०) या निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागातील नगरसेवकांच्या बैठकीत ही निवड करण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी १० वाजता नाशिक पुर्व, साडे अकरा वाजता नाशिक पश्चिम, दुपारी एक वाजता पंचवटी, अडीच वाजता सिडको, चार वाजता सातपुर व सायंकाळी साडेपाच वाजता नाशिकरोडच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे.

Nanded News: नांदेड गुन्हे शाखेच्या खुर्चीसाठी ‘पडद्याआड’ खलबते; अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे स्थानिक राजकीय खेळी

नाराजी काढणार

सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपात महापौर, उपमहापौर व स्थायी या महत्वाच्या पदांसाठी इच्छूकांची संख्या अधिक होती. त्यातही शिंदे सेनेला उपमहापौरपद देण्यात आले, त्यामुळे पक्षातील इच्छूकांना मुरड घालावी लागली. त्यामुळे तीन ते चार वेळा निवडून आल्यानंतरही पक्षाकडून न्याय मिळत नसल्याची भावना ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये आहे. प्रभाग समिती सभापतीपदासाठी भाजपाकडून पक्षातील नाराजांना संधी देवून चुचकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

भाजपचे वर्चस्व राहणार

महापालिकेच्या निवडणूकीत १२२ सदस्यांमध्ये भाजपाचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आले आहेत, त्या खालोखाल शिंदे गटाचे २६, शिवसेना ठाकरे गटाचे १५, अजित पवार गटाचे ५. कॉग्रेसचे तीन व मनसे, अपक्ष प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे. पंचवटी, सिडको व सातपुर या तीन्ही प्रभागात भाजपाचे वर्चस्व असल्यामुळे तेथे भाजपाचाच सभापती होणार आहे. तर पश्चिम व पूर्वमध्ये भाजपाला शिंदे गटाची मदत घ्यावी लागणार आहे. नाशिकरोडला ठाकरे गटाकडे सर्वाधिक नगरसेवक असले तरी, त्यांना स्वबळावर सत्ता हस्तगत करणे कठीण जाणार आहे.

Zee Marathi Serial : अखेर बाप लेक एकत्र येणार ; जीव देणाऱ्या वडीलांना केदार वाचवणार , 

मंत्री महाजन घेणार अंतिम निर्णय

कुंभमेळामंत्री गिरीष महाजन व भाजपाचे प्रभारी आमदार मंगेश चव्हाण हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत प्रभाग सभापतीपदाचे उमेदवार ठरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी इच्छुकांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.

 

Web Title: Prabhag sabhapati elections on april 30 bjp aspirants intensify lobbying

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • girish mahajan

संबंधित बातम्या

Jalgaon News: ‘मियावाकी’ने शहराला मिळणार हरितसंजीवनी! मंत्री महाजनांचा पुढाकार
1

Jalgaon News: ‘मियावाकी’ने शहराला मिळणार हरितसंजीवनी! मंत्री महाजनांचा पुढाकार

Nashik Kumbh Mela Tender Scam:नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
2

Nashik Kumbh Mela Tender Scam:नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.