Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे सांगत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. मुंबईतील ३० लाख प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 19, 2026 | 08:10 PM
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संप मागे घेण्याचे आवाहन
  • सरकार आणि बेस्ट प्रशासन कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन तोडगा काढण्यासाठी सरकार कटिबद्ध
 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव आसिम कुमार गुप्ता, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, कृती समितीचे प्रतिनिधी सचिन अहिरे, गजानन नांगे, नितीन नांदगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. कामगारांच्या हिताबरोबरच मुंबईकरांचे हितही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिवेशनादरम्यान होणार उच्चस्तरीय बैठक

मंत्री सरनाईक म्हणाले की, “येत्या अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये या प्रश्न संदर्भात बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तत्पूर्वी स्थानिक प्रश्नासंदर्भात महाव्यवस्थापक स्तरावर ज्या मागण्या पूर्ण करणे शक्य आहे, त्या या आठवड्याभरात पूर्ण कराव्यात असे निर्देश मी संबंधितांना दिले आहेत.”

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या जागेवरच मिटणार; ‘या’ तारखेला सासवडमध्ये विशेष कॅम्प

जनहिताचा विचार करण्याचे आवाहन

“बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. दररोज सुमारे ३० लाख प्रवासी बेस्ट सेवेवर अवलंबून आहेत. तसेच ४८ हजारांहून अधिक कामगार या संस्थेशी जोडलेले आहेत. त्यामुळे संपामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे मोठे हाल होऊ शकतात. चर्चा सकारात्मक वातावरणात सुरू असून, कर्मचाऱ्यांनी जनहिताचा विचार करून संप मागे घ्यावा,” असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

सरकार आणि बेस्ट प्रशासन कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध असून, संवादाच्या माध्यमातून सर्व प्रश्न निकाली निघतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Pratap Sarnaik : आता काय खैर नाही…! मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कारवाई

Web Title: Pratap sarnaik appeal best workers withdraw strike mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Best
  • best bus
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

Mumbai BEST Bus Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक, २७६६ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर, मुंबईकरांचे हाल
1

Mumbai BEST Bus Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक, २७६६ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर, मुंबईकरांचे हाल

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचा ‘उजवा हात’ खेचणारा तो नेता कोण? ६ खासदार फुटण्यामागचे ‘हे’ मोठे गुपित आले समोर!
2

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचा ‘उजवा हात’ खेचणारा तो नेता कोण? ६ खासदार फुटण्यामागचे ‘हे’ मोठे गुपित आले समोर!

‘त्यांच्या’ साठी 24 तास दरवाजे खुले,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य
3

‘त्यांच्या’ साठी 24 तास दरवाजे खुले,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य

बेस्टला १,०६० कोटींच्या अनुदानाला ब्रेक; जुन्या खर्चाचा हिशेब मागवत स्थायी समितीचा निर्णय
4

बेस्टला १,०६० कोटींच्या अनुदानाला ब्रेक; जुन्या खर्चाचा हिशेब मागवत स्थायी समितीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.