Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai BEST Bus Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक, २७६६ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर, मुंबईकरांचे हाल

कोर्टाने बंदी घातल्यानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केल्याने मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. मुंबईतील बहुतांश डेपोमधून सकाळपासून एकही बस बाहेर पडलेली नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार, २७६६ बसपैकी केवळ ३२ बस रस्त्यावर धावत आहेत. परिणामी, कार्यालयीन वेळेत चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 19, 2026 | 11:22 AM
बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक, २७६६ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर, मुंबईकरांचे हाल

बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक, २७६६ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर, मुंबईकरांचे हाल

Follow Us
Follow Us:
  • मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप
  • बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक
  • बससेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची भीती
Mumbai BEST Bus Strike : एकीकडे आज म्हणजेच 19 जून 2026 रोजी मुंबईतील बीकेसी येथे ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’ साजरा केला जात आहे, तर दुसरीकडे 18 जूनच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे बस आणि वीज विभागातील कर्मचारी संपावर गेले आहेत.18 जूनच्या सायंकाळी झालेल्या बैठकीत बेस्ट समितीचे सदस्य नितीन नांदगावकर यांनी कर्मचाऱ्यांना मध्यरात्रीनंतर डेपोतून एकही बस बाहेर काढू नये, असे आवाहन करत आंदोलनाची घोषणा केली. या बैठकीला चालक, वाहक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

मुंबईतील २२ बस डेपो जागतिक दर्जाचे होणार; ‘बेस्ट’च्या पुनर्विकासाची …

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टची बससेवा ठप्पमुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. या संपामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता असून रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मनमानीही वाढू शकते. दरम्यान, मुंबईतील बहुतांश डेपोमधून आज सकाळपासून एकही बस निघालेली नाही. यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठताना चाकरमान्यांचे प्रवासाचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सीसाठी रांगा लागल्या आहेत. २७६६ बसपैकी फक्त ३२ बस रस्त्यावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, बेस्ट प्रशासनाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत औद्योगिक न्यायालयाने ‘बेस्ट कामगार संयुक्त कृती समिती’शी संबंधित कर्मचारी आणि वेट-लीज ऑपरेटरांना १८ जूनच्या मध्यरात्रीपासून प्रस्तावित संपावर जाण्यास तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय कायम ठेवला आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

बेस्टच्या अर्थसंकल्पाचे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण

वेतन कराराची अंमलबजावणी

थकीत देयकांचे तातडीने भुगतान

कंत्राटीकरणावर बंदी

नव्या बसांचा ताफ्यात समावेश

पब्लिक ट्रान्सपोर्ट डे निमित्त अतिरिक्त बसांची व्यवस्था

पब्लिक ट्रान्सपोर्ट डेच्या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने १२ अतिरिक्त बसांची व्यवस्था केली आहे. बस मार्ग क्रमांक ३१०, बीकेसी-२ आणि बीकेसी-३ या मार्गांवर प्रत्येकी चार अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. बेस्टच्या आकडेवारीनुसार, बीकेसी परिसरात सामान्य दिवशी १६ बस मार्गांवर १२५ बसांद्वारे १७६ फेऱ्या चालवल्या जातात. याशिवाय ‘चलो प्रीमियम’ अॅपआधारित १०४ बसही बीकेसी परिसरात उपलब्ध राहणार असून प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, संप कायम राहिल्यास या अतिरिक्त व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबईची दुसरी ‘लाईफलाईन’ संकटात! बेस्टमध्ये 16 हजारांहून अधिक पदे रिक्त

Web Title: Best indefinite strike despite court ban only 32 buses on road mumbaikars face hardship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Best
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १
3

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.