Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Mahamandal : एसटी महामंडळाचे १२ कोटी रुपये वाचणार! नेमका काय आहे परिवहनमंत्र्यांचा निर्णय

एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावर देण्यात येणाऱ्या सवलत दरात प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रताप सरनाईक यांच्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाचे १२ कोटी रुपये वाचणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2025 | 06:24 PM
एसटी महामंडळाचे १२ कोटी रुपये वाचणार! नेमका काय आहे परिवहनमंत्र्यांचा निर्णय (फोटो सौजन्य-X)

एसटी महामंडळाचे १२ कोटी रुपये वाचणार! नेमका काय आहे परिवहनमंत्र्यांचा निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दाखवलेला व्यवसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे. येत्या १ ऑगस्ट पासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात (Discount rate) प्रति लिटर ३० पैशाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी ३ लाख २३ हजार रुपये याप्रमाणे वर्षाला अंदाजे ११ कोटी ८० लाख रुपये इतकी बचत होणार आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता मंडपासाठी खड्डा खणल्यास…; मंत्री लोढा यांची स्पष्ट भूमिका

गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कडून डिझेल इंधन खरेदी करत आहे. सध्या दररोज एसटी महामंडळाला सरासरी १०.७७ लिटर डिझेल लागते. एसटी महामंडळ हे या कंपन्यांचा मोठा खरेदी ग्राहक ( bulk purchase customer) असल्यामुळे संबंधित कंपन्या महामंडळाला प्रति लिटर सवलत देत होत्या. परंतु एसटी महामंडळाने वारंवार विनंती करूनही कित्येक वर्ष या कंपन्यांनी सवलत दरात बदल केला नव्हता.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये मध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली. त्यासाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तीन-चार बैठका घेण्यात आल्या. तसेच डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खाजगी कंपन्या सोबत देखील वाटाघाटी करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी ठेवली.

या सर्वांचा परिणाम म्हणजे संबंधित कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार यत्या १ ऑगस्ट पासून मुळ सवलत दरात प्रति लिटर ३० पैसे वाढ करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे. सध्या एसटीच्या २५१ आगारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सहाय्याने दररोज सरासरी १० कोटी ७८ लाख लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कडून पुरविण्यात येते. भविष्यात वाढत्या बसेसच्या संख्येमुळे डिझेल इंधनाची खपत देखील वाढणार आहे. त्यामुळे प्रति लिटर ३० पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे वर्षाकाठी एसटी महामंडळाची अंदाजे १२ कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे.

” एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या, ज्या ठिकाणी पैशाची बचत आणि काटकसर करणे शक्य आहे, त्या त्या ठिकाणी बचत आणि काटकसर केली पाहिजे! तसेच तिकीट विक्रीच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्त्रोत देखील निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थात, या दोन्ही प्रयत्नातून भविष्यात एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल!” असा विश्वास परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

कारगिल युद्धातील माजी सैनिकाला नागरिकत्व सिद्ध करण्यास भाग पाडल्याचा आरोप; पुण्यातील कुटुंबाची तक्रार

Web Title: Pratap sarnaik st news from august 1 indian oil and bharat petroleum have increased the subsidized rate on diesel fuel supplied

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
1

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक
2

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक

एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय होणार? ऐन सणासुदीच्या काळात कर्मचारी संघटनेचा संपाचा इशारा
3

एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय होणार? ऐन सणासुदीच्या काळात कर्मचारी संघटनेचा संपाचा इशारा

दहा दिवसात लालपरी झाली मालामाल! गणेशोत्सवाच्या काळात एसटीला मिळाले २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न
4

दहा दिवसात लालपरी झाली मालामाल! गणेशोत्सवाच्या काळात एसटीला मिळाले २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.