Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिशोब व्याजासहित चुकता केला जाईल, नितेश राणेंचे टीकास्त्र

कोकणातून उध्दव ठाकरे सेनेला जनतेने हद्दपार केले, खासदार नारायण राणे यांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 05, 2024 | 02:43 PM
हिशोब व्याजासहित चुकता केला जाईल, नितेश राणेंचे टीकास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : काल लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल लागला या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा 48 हजार मतांनी विजय झाला आहे. कालच्या निकालानंतर राजकीय कार्यकर्ते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज सकाळी नितेश राणे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर घणाघात टीका केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये नितेश रंगे म्हणाले की, गेल्या 10 वर्षात काम न केल्याने विनायक राऊत यांना लोकांनी ठरवून घरी बसवलं आहे. जनतेने राऊतांना मुंबईचे तिकीट मी सांगितल्याप्रमाणे काढून दिलं आहे अशी टीका विनायक राऊत यांच्यावर केली.

[read_also content=”नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला घेणार पंतप्रधानपदाची शपथ? NDA तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार https://www.navarashtra.com/india/government-formation-2024-narendra-modi-likely-to-take-oath-as-prime-minister-for-third-time-on-june-8-543126.html”]

पुढे ते म्हणाले की, खासदार नारायण राणे यांनी गेली 40 वर्षे आपले सर्वस्व पणाला लावत सिंधुदुर्गवासियांची सेवा केली. त्या जनतेने मतदानाच्या रुपाने त्यांना आशिर्वाद दिले. कोकणातून उध्दव ठाकरे सेनेला जनतेने हद्दपार केले आहे. खासदार म्हणून नारायण राणे यांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानतो. मात्र, काहीजणांचे हिशोब चुकते करायचे असून आगामी काळात ते व्याजासहीत चुकते केले जातील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

पुढे नितेश राणे म्हणाले की, आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत आपल्या हक्काचा खासदार निवडून आला आहे. गेल्या वर्षभरात भाजपाचे नेते सातत्याने सांगत होते. ते म्हणजे यापुढचा खासदार हा कमळ या चिन्हाचा असेल. कारण येथील जनतेने ठरवेल होते. विनायक राऊत यांना घरी बसवायचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले समर्थन देण्यासाठी जनतेने हा निकाल दिला. या मतदार संघातील लोकांचे आभार मानतो. खासदार नारायण राणे यांनी गेली 40 वर्षे केलेली जनतेची सेवा आणि आपल्या जीवनातील पणाला लावलेले सर्वस्व, त्याची पोचपावती आणि आशीर्वाद जनतेने दिले आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेही आम्ही आभारी आहोत. रविंद्र चव्हाण यांच्याकडून पालक कसा असावा? हे समजते. एक नेतृत्व काय करु शकत? हे त्यांनी दाखवून दिले आहे. भाजपा पक्ष आणि महायुती कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केलं. त्यामुळे यश प्राप्त झाले आहे. या निकालात मॅन ऑफ द मॅच देण्यासारखे काम शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कृतीतून करुन दाखविले आहे. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला. तसेच महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि त्यांचा पक्ष पाठीशी राहिला असे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

[read_also content=”“उबाठा नावाची काळी मांजर कोकणातून हद्दपार” आमदार नितेश राणे यांची जहरी टीका https://www.navarashtra.com/maharashtra/mla-nilesh-rane-target-uddhav-thackeray-group-and-mp-sanjay-raut-for-trying-goverment-of-india-loksabha-elections-nrpm-2024-543116.html”]

परंतु या निवडणूक निकालात काही कटू अनुभव आला, त्याची चर्चा महायुतीच्या बैठकीत होईल. महायुतीच्या नेत्यांनी उबाठाला या मतदार संघात राजकीय शत्रू समजून काम केलं पाहिजे. अन्यथा महायुतीसाठी ताकद असून देखील पुढील निवडणुका अवघड जातील. उबाठाच्या अदृश्य हातांचे मी आभार मानतो, त्यांच्या मदतीमुळे आमचा हा विजय सुकर झाला. बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांनी राणेंना मदत करण्याचे ठरवलं. त्यांनी आमच्यासोबत काम केलं आहे. उद्धव ठाकरे यांची काँग्रेससोबत जाण्याची भूमिका त्यांना आवडली नव्हती. विनायक राऊत यांची भूमिका देखील आवडली नव्हती. त्यांनी आम्हाला मदत केली . त्या सर्वांचे आभार मानतो. आता जिल्ह्यातील उबाठा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते की पक्ष राहतो, हे यापुढे आम्हाला कळेलच.

पुढे नितेश राणे म्हणाले की, माझ्या मतदार संघातील मतदारांचे मनापासून आभार मानतो. लोकसभेत या मतदार संघात 41 हजारांचे लीड दिले त्याबद्दल समाधान व्यक्त करतो. उद्धव ठाकरे यांची कणकवलीत सभा झाली. त्यात आम्हाला त्यांनी शिव्या शाप दिले तेव्हाच मी सांगितले मतदार त्याचा वचपा काढतील. ते या निकालातून दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीत 30 हजाराचे लीड मला होते ते 42 हजार झाले आहे. माझे मतदार यापुढील निवडणुकीत आणखी पाठीशी राहतील. विकास करण्यात व्यस्त राहण्याबाबत मला मतदार सांगतात. त्यामुळे तिन्ही तालुक्यातील मतदारांचे आभार मानतो. वैभव नाईक यांच्या मतदार संघात मिळालेल्या मताधिक्याने पुन्हा एकदा कुडाळ आणि मालवणमध्ये जनता राणे आणि भाजपच्या पाठीशी राहिली. त्यामुळे वैभव नाईक यांचा पराभव अटळ असल्यानचेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून येतील. राज ठाकरे यांचे आभार मानतो. राणेंसाठी त्यांनी सभा घेतली, प्रचार केला. त्यांच्या प्रभावामुळे आम्हाला मदत झाली. राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे बाक वाजवणार खासदार नको, मंत्री होणारा खासदार निवडून द्या. त्यामुळे आता जनतेने विनायक राऊत यांना मुंबईचे तिकीट काढुन दिल्याचा टोला आमदार नितेश राणे यांनी यावेळी लगावला.

Web Title: Press conference in sindhudurga after nitesh rane mp narayan rane won

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • MP Narayan Rane
  • Nitesh Rane

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.