सफाई कामगाराला 20 हजारांची लाच मागणं वरिष्ठ लिपिकाला भोवलं; 'एसीबी'ने जाळ्यात पकडलं
केज : तालुक्यातील विडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सहशिक्षक पदावर असलेल्या शिक्षक हे वैद्यकीय रजेहून कर्तव्यावर रूजू करुन घेण्याच्या अर्जावर गटशिक्षणाधिकारी यांची सही घेण्यासाठी मुख्याध्यापक सुर्वे यांनी शिक्षकाकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. शिक्षकाने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. मुख्याध्यापक सुर्वे यांनी दोन हजार रुपये मागितल्याचे मान्य केले. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Walmik Karad : CID चे अधिकारी सारंग आव्हाड यांनी वाल्मिक कराडविषयी दिली मोठी माहिती; म्हणाले, ‘फरार आरोपी…’
तक्रारदार जि.प.शाळेतील शिक्षक हे वैद्यकीय रजेवर होते. रजेवरुन हजर होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे त्यांनी अर्ज केला. त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी तुमचे मुख्याध्यापक सुर्वे यांच्याकडे अर्ज देण्यास सांगितला. तक्रारदार शिक्षक, मुख्याध्यापक सुर्वे यांना भेटले असता त्यांनी सदर अर्जावरुन कर्तव्यावर हजर करुन घेण्यासाठी व गटशिक्षणाधिकारी यांची सही घेण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाच मागणी पडताळणी केली असता मुख्याध्यापक सुर्वे यांनी तक्रारदार यांना पंचासमक्ष गटशिक्षण अधिकारी यांच्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरुन लोकसेवक सुर्वे यांचे विरुद्ध केज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक किरण बगाटे, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भारत गरदे, अविनाश गवळी, खरसाडे, पुरी यांनी केली.
पुण्यातही घडलं लाचप्रकरण
वारस नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या बाणेरमधील तलाठ्यासह मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. एसीबीच्या पथकाने तलाठ्याच्या कारची तपासणी केली. तेव्हा मोटारीत ३ लाख रुपयांची रोकड आढळून आली. याप्रकरणी तलाठ्यासह मध्यस्थावर बाणेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तलाठी उमेश विठ्ठल देवघडे (वय ३९), मध्यस्थ काळूराम ज्ञानदेव मारणे (वय ३९, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.