Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनए जमिनीची प्रक्रिया आता होणार आणखी सोपी; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

आता या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना एका क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने रूपांतरण अधिमूल्य भरता येणार असून, त्याची नोंद थेट ७/१२ उताऱ्यावर होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 22, 2026 | 01:16 PM
एनए जमिनीची प्रक्रिया आता होणार आणखी सोपी;

एनए जमिनीची प्रक्रिया आता होणार आणखी सोपी;

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक (एनए) रुपांतरण प्रक्रियेला आजपासून अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली (बीपीएमएस) या ऑनलाइन प्रणालीमध्ये अकृषिक रुपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आली. या नव्या सुविधेचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

यापूर्वी अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना एका क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने रूपांतरण अधिमूल्य भरता येणार असून, त्याची नोंद थेट ७/१२ उताऱ्यावर होणार आहे. राज्यातील नागरिकांना घरांचे किवा व्यावसायिक प्रकल्पांचे बांधकाम करताना अकृषिक परवानगीसाठी अनेक महिने वाट पाहावी लागत होती. ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढेल. १० फेब्रुवारीच्या शासन निर्णयातील तरतुदींना या प्रणालीमुळे खऱ्या अर्थाने गती मिळेल. प्रशासकीय विलंब टाळून ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ला प्रोत्साहन देणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.

Raigad News : डॅमने घेतला तरुणाचा जीव ! पोहायला उतरलेला आर्यन परतलाच नाही; कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, जमिनीच्या अकृषिक वापराबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. याच इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणालीचे लोकार्पण निर्णयाला तांत्रिक जोड देण्यासाठी मंगळवारी बीपीएमएस प्रणाली गो-लाईव्ह करण्यात आली. यामुळे नागरिकांना जमिनीवर विकास परवानगी किंवा बांधकाम आराखडे मंजूर करून घेतानाच एकरकमी रूपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. या प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बिगरशेती वापरासाठी आवश्यक असणारे एकरकमी रूपांतरण अधिमूल्य आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची नाही आता गरज

नागरिकांना आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार नाही. अधिमूल्य भरल्यानंतर त्याची माहिती महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीशी जोडली गेली असल्याने, सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद स्वयंचलित पद्धतीने घेतली जाणार आहे. बीपीएमएसच्या धर्तीवरच ऑटो डीसीआर प्रणालीमध्येही आवश्यक सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील १० दिवसांत हे काम पूर्ण होईल, ज्यामुळे मोठ्या विकास प्रकल्पांच्या मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Web Title: Process for na land conversion will now become even simpler

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव
1

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

Mumbai News: दुर्मीळ रक्तपुरवठ्याचा प्रश्न गंभीर! नवजात बालकासाठी रक्ताच्या आवाहनाने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
2

Mumbai News: दुर्मीळ रक्तपुरवठ्याचा प्रश्न गंभीर! नवजात बालकासाठी रक्ताच्या आवाहनाने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी थांबवल्याप्रकरणी 131 चालक-वाहकांवर कारवाई; पगारातून वसूल होणार दंड
3

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी थांबवल्याप्रकरणी 131 चालक-वाहकांवर कारवाई; पगारातून वसूल होणार दंड

Mumbai News: राज्यात मिथेनॉल माफियांवर छापेमारी! ९८८ परवानाधारकांची तपासणी फास्ट ट्रॅकवर; ५० संस्था बंद
4

Mumbai News: राज्यात मिथेनॉल माफियांवर छापेमारी! ९८८ परवानाधारकांची तपासणी फास्ट ट्रॅकवर; ५० संस्था बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.