Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: हवामान बदलासाठी ‘कूल क्रायम्ब’ प्रकल्प! मुंबई विद्यापीठ-ब्रिस्टल विद्यापीठासोबत राबविणार संयुक्त मोहीम

Mumbai News: मुंबई महानगर प्रदेश आणि कोकणातील सहा समुदाय सहनिर्मिती प्रयोगशाळांच्या माध्यमातून पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास केला जाणार आहे. स्थानिक गरजांनुसार उपाययोजना विकसित जातील. भारतात आतापर्यंत ४१ संस्था या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 24, 2026 | 10:26 AM
हवामान बदलासाठी 'कूल क्रायम्ब' प्रकल्प! मुंबई विद्यापीठ-ब्रिस्टल विद्यापीठासोबत राबविणार संयुक्त मोहीम

हवामान बदलासाठी 'कूल क्रायम्ब' प्रकल्प! मुंबई विद्यापीठ-ब्रिस्टल विद्यापीठासोबत राबविणार संयुक्त मोहीम

Follow Us
Follow Us:

Mumbai News: हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक पातळीवर शाश्वत उपाययोजना विकसित करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठ आणि ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठाने ‘कूल क्रायम्ब’ हा संयुक्त प्रकल्प सुरू केला आहे. ब्रिटिश कौन्सिल-एचएसबीसीच्या ‘क्लायमेट स्किल्स ग्लोबल कोलॅबोरेशन ग्रँट्स’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून युवकांना हरित कौशल्यांचे प्रशिक्षण, हरित उद्योजकतेला प्रोत्साहन आणि समुदायाधारित हवामान कृतीला चालना दिली जात आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mangal Prabhat Lodha: विद्यार्थ्यांनो, तुमच्या कल्पनांना मिळणार नवी दिशा! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी…

मुंबई विद्यापीठाच्या हवामान बदल आणि शाश्वतता अभ्यास केंद्राच्या समन्वयाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. डॉ. अपर्णा फडके या प्रकल्पाचे नेतृत्व करीत असून प्रा. इंदू जॉर्ज आणि प्रा. स्मिता शुक्ला सहसमन्वयक आहेत. ब्रिस्टल विद्यापीठातील ब्रिग्स्टो इनस्टट्यूट आणि कॅबॉट इनस्टट्यूट यांचेही या उपक्रमात सहकार्य आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर प्रदेश आणि कोकणातील सहा समुदाय सहनिर्मिती प्रयोगशाळांच्या माध्यमातून पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करून स्थानिक गरजांनुसार उपाययोजना विकसित केल्या जात आहेत. भारतात आतापर्यंत ४१ संस्था या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत.

कामाचा आणि साध्य केलेल्या यशाचा आढावा

प्रकल्पांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचा आणि साध्य केलेल्या यशाचा आढावा मांडणाऱ्या ‘री रूट शोकेस’ या विशेष कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी होते. त्यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. ब्रिस्टल विद्यापीठाच्या प्रा. अॅग्नेस नायरन आणि ब्रिटिश कौन्सिलच्या राशी जैन व अनू थम्पी यांचीही उपस्थिती होती.

ब्रिस्टलमधील पाच युवा प्रतिनिधींची मुंबई विद्यापीठाला भेट

ब्रिस्टलमधील समुदायांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच युवा प्रतिनिधींनी १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई विद्यापीठाला भेट दिली होती. त्यांच्यासोबत प्रा. लियांग फॉन्ग वाँग, डॉ. गोया विल्सन आणि डॉ. पेन विल्यम्स उपस्थित होते. या भेटीदरम्यान ब्रिस्टलच्या प्रतिनिधींनी मुंबईतील जुहू मोरा गाव आणि ठाणे घनकचरा व्यवस्थापन या दोन समुदाय सहनिर्मिती प्रयोगशाळांना भेट देऊन स्थानिक समुदायांशी थेट संवाद साधला.

महिलेची ओळख ठरली महागात;व्हिडीओ कॉल, ब्लॅकमेलिंग अन् अश्लील व्हिडीओची धमकी देत ४ कोटी उकळले

विद्यार्थ्यांना अनुभवांची देवाण-घेवाण करणार

२९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाचे पाच विद्यार्थी प्रतिनिधी डॉ. अपर्णा फडके यांच्या नेतृत्वाखाली ब्रिस्टलला भेट देणार आहेत. तेथील समुदायाधारित हवामान बदल अनुकूलन पद्धतींचा अभ्यास करून अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत. हरित कौशल्यांमधील उणीव, पर्यावरणपूरक नवकल्पना आणि समुदायांची हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता या विषयांवर ‘री-रूट’ कार्यक्रमात चर्चासत्रे आणि कार्यशाळा घेण्यात आल्या. या आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे युवकांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘कूल क्रायम्ब’ प्रकल्प म्हणजे काय?

    Ans: ‘कूल क्रायम्ब’ हा हवामान बदलाशी संबंधित संशोधन आणि जनजागृतीसाठी राबविण्यात येणारा संयुक्त उपक्रम असल्याचे बातमीच्या शीर्षकातून सूचित होते. प्रकल्पाची नेमकी उद्दिष्टे आणि कार्यपद्धती यासाठी अधिकृत माहिती आवश्यक आहे.

  • Que: ‘कूल क्रायम्ब’ प्रकल्प कोणत्या विद्यापीठांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे?

    Ans: या प्रकल्पासाठी मुंबई विद्यापीठ आणि ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठ संयुक्त मोहीम राबविणार असल्याचे शीर्षकात नमूद आहे.

  • Que: हवामान बदलाचा मुंबईवर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, शहरी पूर आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ ही मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरांसाठी महत्त्वाची आव्हाने आहेत.

Web Title: Mumbai news mumbai university and bristol university join forces for cool climb climate change project sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • environment
  • Environmental Issue
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News : ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा एल्गार! SIR वरून मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक
1

Mumbai News : ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा एल्गार! SIR वरून मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक

Mumbai News : मुंबईकरांनो, लक्ष द्या! 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी, मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा आदेश
2

Mumbai News : मुंबईकरांनो, लक्ष द्या! 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी, मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा आदेश

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच
3

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच

दु:खद! मुंबईत गरबा खेळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू; गोरेगावमधील धक्कादायक घटना
4

दु:खद! मुंबईत गरबा खेळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू; गोरेगावमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.