Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : मुंबईकरांनो, लक्ष द्या! 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी, मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा आदेश

Mumbai News : मुंबईत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव, मिरवणुका आणि काही सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असतील.

  • By विवेक
Updated On: Oct 22, 2026 | 08:32 PM
mumbai Police

mumbai Police

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी आदेश
  • पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावावर निर्बंध
  • मिरवणूक, ध्वनीवर्धक आणि फटाके फोडण्यावर प्रतिबंध
 

Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हा आदेश लागू केला आहे. या आदेशामुळे सार्वजनिक ठिकाणी एकत्र येताना नागरिकांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.

पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावावर निर्बंध

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय मिरवणूक काढणे, जमाव करून ध्वनीवर्धक किंवा सांगितीय बँडचा वापर करणे आणि फटाके फोडणे यांवरही प्रतिबंध लागू करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7/12 वरील जमीन हिस्सा विक्रीसाठी नवा नियम, फडणवीस सरकारचे नवे आदेश

त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम किंवा मिरवणुकीचं नियोजन करणाऱ्यांनी लागू असलेल्या नियमांची माहिती घेणं आवश्यक आहे.

कोणत्या कार्यक्रमांना मिळाली सूट?

या जमावबंदी आदेशातून काही कार्यक्रमांना वगळण्यात आलं आहे. विवाह समारंभ, विवाहाशी संबंधित अन्य विधी आणि अंत्यविधी यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

तसंच कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमधील कार्यक्रम, सामाजिक मेळावे आणि संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणाऱ्या कार्यक्रमांनाही सूट देण्यात आली आहे.

शाळा, कार्यालयं आणि दुकाने सुरू राहणार

चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणं, न्यायालयं, सरकारी व निमसरकारी कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील नियमित कामकाजाला या आदेशातून वगळण्यात आलं आहे.

कंपन्या, कारखाने, दुकाने आणि इतर आस्थापनांमधील नियमित व्यापार व व्यवसायासाठी होणाऱ्या जमावालाही सूट देण्यात आली आहे.

परवानगी असलेल्या मोर्चांना अडथळा नाही

शांततापूर्ण मार्गाने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली असेल, तर अशा मोर्चालाही जमावबंदी आदेशातून सूट असेल.

पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी आदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येताना लागू असलेल्या निर्बंधांची नोंद घ्यावी आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं.

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक वेगवान! ‘५९ मिनिटांत मुंबई’चे लक्ष्य दृष्टिपथात; फडणवीसांचे वक्तव्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईत जमावबंदी किती तारखेपर्यंत लागू आहे?

    Ans: बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

  • Que: जमावबंदी आदेशानुसार कोणत्या गोष्टींवर निर्बंध आहेत?

    Ans: पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव, मिरवणूक काढणे, जमाव करून ध्वनीवर्धक किंवा सांगितीय बँडचा वापर करणे आणि फटाके फोडणे यांवर निर्बंध आहेत.

  • Que: जमावबंदीच्या काळात विवाह आणि अंत्यविधी करता येतील का?

    Ans: होय. विवाह समारंभ, विवाहाशी संबंधित अन्य समारंभ आणि अंत्यविधी कार्यक्रमांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

Web Title: Mumbai news section 144 prohibitory order till october 25 2026 in mumbai vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai News
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Mumbai News : ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा एल्गार! SIR वरून मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक
1

Mumbai News : ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा एल्गार! SIR वरून मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच
2

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच

दु:खद! मुंबईत गरबा खेळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू; गोरेगावमधील धक्कादायक घटना
3

दु:खद! मुंबईत गरबा खेळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू; गोरेगावमधील धक्कादायक घटना

Mumbai News: साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी! आपत्कालीन दुर्घटनांचे सत्र, आरटीआयमधून धक्कादायक वास्तव झाले उघड
4

Mumbai News: साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, २,४०८ जखमी! आपत्कालीन दुर्घटनांचे सत्र, आरटीआयमधून धक्कादायक वास्तव झाले उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.