मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून महाराष्ट्रातल्या काही गावांवर दावा सांगितला आहे. तसेच, महाराष्ट्रात कन्नड भवन (Kannada Bhavan) उभारण्याची घोषणाही केली आहे. त्यावरुनच संजय राऊतांना (Sanjay Raut) त्यांना प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर भाष्य केले. ते म्हणाले, आमचा कानडी बांधवांशी कोणताही वाद नाही. मुंबईमध्ये (Mumbai) कन्नड बांधवांसाठी अनेक हॉल्स आहेत, भवने उभारण्यात आली आहे. आम्ही त्याला कधीही विरोध केला नाही. आमचा वाद नाही, पण तो तुम्ही निर्माण करत आहेत. हा जो सीमाभागाचा लढा आहे, तुम्ही गावांवर आता हक्क सांगू लागला आहे. कर्नाटक भवन बांधायला आमचा विरोध नाही. पण ते तुम्ही करणार असाल, तर आम्हालाही बंगळुरू आणि बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या, असे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्न चिघळवला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूरमधील काही गावांवर दावा सांगितला आहे. त्यातच येथील ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे.