Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिकलसेल आजार नियंत्रणासाठी सिंदखेडराजात जनजागृती; विवाहपूर्व तपासणीचे आवाहन

जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विवाहयोग्य तरुण-तरुणींनी लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी करून घेणे हा आजार नियंत्रणाचा प्रभावी मार्ग असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 21, 2026 | 07:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात नागरिकांना सिकलसेल आजाराविषयी सविस्तर माहिती देत विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व पटवून सांगण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास दराडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकुमार साळवे यांनी नवविवाहित तसेच विवाहयोग्य तरुण-तरुणींनी लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी करून घेणे हा आजार नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी उपाय असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात “सिकलसेल जाणूया, सिकलसेल टाळूया” हा संदेश देत या आनुवंशिक आजाराची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात आली. वारंवार ताप येणे, थकवा, रक्ताची कमतरता, अशक्तपणा, सांधेदुखी, वारंवार संसर्ग होणे, पोटाच्या डाव्या बाजूला वेदना आणि चेहरा निस्तेज दिसणे ही सिकलसेलची प्रमुख लक्षणे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञांच्या मते, पुढील पिढीपर्यंत हा आजार पोहोचू नये यासाठी प्रत्येक तरुण-तरुणीने विवाहपूर्व तपासणी करणे आवश्यक आहे. ही तपासणी शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असून अधिक माहितीसाठी नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी किंवा सिकलसेल समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाला डॉ. परमेश्वर चाटे, डॉ. सैय्यद रेहान, दादाराव खरात, दिलीप मेहेत्रे, डॉ. बुधवत, डॉ. खान, डॉ. गाणार यांच्यासह अनेक आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रमुख शास्त्र तंत्रज्ञ वर्षा डोंगरदिवे यांनी केले, तर आभार तालुका सिकलसेल सहाय्यक प्रवीण शिंदे यांनी मानले.

Web Title: Public awareness campaign in sindkhed raja for sickle cell disease control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • latest news

संबंधित बातम्या

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
1

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
2

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
3

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.