Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

सहलीला जाण्यासाठी पहिल्यांदाच हट्ट करणारा सुमित आई-वडिलांना सोडून कायमचा निघून जाईल, याची कल्पनाही कुटुंबीयांना नव्हती. इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवेआगरला गेलेल्या सुमितसह आठ विद्यार्थ्यांना समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केले आणि एका क्षणात आठ कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 02, 2026 | 12:13 PM
Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Follow Us
Follow Us:
  • दिवेआगर समुद्रात आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
  • इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणारा सुमितही काळाच्या पडद्याआड
  • सहलीतील सुरक्षा व्यवस्थेवर उपस्थित झाले गंभीर प्रश्न
 

रायगड : सहलीचा आनंद लुटण्यासाठी हसत-खेळत घराबाहेर पडलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांवर दिवेआगरच्या समुद्रकिनारी काळाने घाला घातला. गुरुवारी सायंकाळी समुद्रात उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ जण पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेने विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

सुमितने पहिल्यांदाच केला होता हट्ट

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुमित भरत अहिरे याच्या आठवणी सांगताना त्याचे मामा मुकेश माळी यांना अश्रू अनावर झाले. सुमितने कधीही कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नव्हता. मात्र, पहिल्यांदाच त्याने दिवेआगरच्या सहलीला जाण्याचा हट्ट केला आणि कुटुंबीयांनी त्याला परवानगी दिली. सुमितला इंजिनिअर व्हायचे होते. त्यासाठी त्याने विनर्स अकॅडमीत प्रवेश घेतला होता आणि अकरावीपासून JEE परीक्षेची तयारी सुरू केली होती. एकुलता एक असलेला सुमित अभ्यासासोबतच आई-वडिलांचीही काळजी घेत असे. नुकताच त्याचा वाढदिवसही झाला होता. मात्र, दिवेआगरची ही सहल त्याची अखेरची ठरली.

हेही वाचा: Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

४८ जणांचा ग्रुप सहलीला

विनर्स अकॅडमीचे ४८ विद्यार्थी आणि शिक्षकांचा ग्रुप रायगड किल्ला आणि दिवेआगर येथे सहलीसाठी गेला होता. या गटात २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षकांचा समावेश होता. दिवसभर पर्यटन केल्यानंतर विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. सायंकाळी काही विद्यार्थी समुद्रात उतरले. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा आणि समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. या दुर्घटनेत राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासनकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे आणि प्रणव बनसोडे यांचा मृत्यू झाला.

सहलीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर विनर्स अकॅडमीने सहलीचे नियोजन करताना आवश्यक सुरक्षा निकष पाळले होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकॅडमी सुरू करताना आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांना समुद्रात जाण्याची परवानगी होती का, त्यांना जीवरक्षक जॅकेट देण्यात आले होते का आणि समुद्रकिनारी त्यांच्यावर शिक्षकांची प्रत्यक्ष देखरेख किती होती, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच समुद्राची भरती-ओहोटी, पाण्याचा प्रवाह, सुरक्षित क्षेत्र, स्थानिक प्रशासनाचे इशारे आणि बचाव व्यवस्था याबाबत अकॅडमीने आधी माहिती घेतली होती का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

आपत्कालीन व्यवस्थेचाही तपास आवश्यक

सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी करण्यात आली होती का, बचाव पथक किंवा स्थानिक जीवरक्षकांची उपलब्धता तपासली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व बाबींची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित होऊ शकणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हसत-खेळत सहलीला गेलेली मुले पुन्हा घरी न परतल्याने आळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Diveagar sea tragedy eight alandi students death winners academy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Case
  • Beach
  • latest news
  • raigad
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
1

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Diveagar Breaking: मन सुन्न करणारी घटना! दिवेआगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
2

Diveagar Breaking: मन सुन्न करणारी घटना! दिवेआगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
3

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
4

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.