
Agriculture News, Indrayani Rice, Drought, Farmers Protest,
प्राथमिक अंदाजानुसार, तालुक्यातील सुमारे ६५ ते ७० टक्के भातशेती बाधित झाली आहे. भोर तालुका आणि परिसराची शान असलेल्या इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनाला पावसाअभावी मोठा फटका बसणार आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे आगामी काळात बाजारात आवक कमी होऊन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून बियाणे, रासायनिक खते, मशागत आणि लावणीवर शेतकऱ्यां नी मोठा खर्च केला आहे. मात्र, पिकांची वाढ पूर्णपणे खुंटल्यामुळे हा सर्व खर्च वाया जाण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे?
ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी किंवा विंधन विहिरींची सोय आहे, ते पंपाद्वारे पिके जगवण्याची धडपड करत आहेत. मात्र, तीव्र दुष्काळामुळे भूजलपातळी वेगाने खालावली असून वाढता सिंचन खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. परिणामी, बहुतांश कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. या गंभीर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कृषी व महसूल विभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष बांधावर जाऊन तत्काळ पंचनामे करावेत अशी मागणी वीसगाव खोरे, आंबवडे खोरे, हिरडस मावळ खोरे, वेळवंड खोरे, भुतोंडे खोरे, शिवगंगा खोरे, महामार्ग पट्टचातून जोर धरत आहे.
पावसाअभावी भाताचा पेंडा मिळणे कठीण होणार असून, यामुळे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यां समोर जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न उभा ठाकला आहे. तर शेतात केवळ वाळलेली रोपे उभी राहिली आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास चाजारात विकण्यासाठी धान्य दूरच राहिला, पण स्वतःच्या कुटुंबाला वर्षभर खाण्यापुरते अन्न आणि गुरांसाठी चारा मिळणेही मुश्कील होईल, या विचाराने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
भोर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शासनाकडे मदतीसाठी आर्त हाक दिली जात असून शासनाने या भागातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेऊन निकषांनुसार तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी त्रस्त शेतकरी करत आहेत. कृषी विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचे अंतिम वास्तव आकडे समोर येतील.
Ans: पावसाच्या प्रदीर्घ ओढीमुळे भोर तालुक्यातील सुमारे ६५ ते ७० टक्के भातशेती बाधित झाली असून पिके करपू लागली आहेत.
Ans: भोर तालुक्याची मुख्य ओळख असलेल्या आणि बाजारात प्रचंड मागणी असलेल्या प्रसिद्ध 'इंद्रायणी' भाताच्या पिकाला व उत्पादनाला याचा सर्वात मोठा फटका बसत आहे.
Ans: कृषी आणि महसूल विभागाने केवळ प्रशासकीय पातळीवर न थांबता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.