Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणामुळे पुणे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; धीरज घाटे खासदारांवर ‘त्या’ मुद्द्यावर नाराज

मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावर भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2025 | 02:33 PM
मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणामुळे पुणे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; धीरज घाटे खासदारांवर नाराज, वाचा सविस्तर

मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणामुळे पुणे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; धीरज घाटे खासदारांवर नाराज, वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखल करून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. दरम्यान या प्रकरणी डॉ. घैसास यांचे रुग्णालय भाजपच्या महिला आघाडीने फोडले होते. त्यावर पुणे भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणानंतर पुणे भाजप महिला आघाडीने डॉ. घैसास यांच्या रुग्णालयांची तोडफोड केली होती. यावर भाजपच्या राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता धीरज घाटे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार मेधा कुलकर्णी यांनी पाठवलेल्या पत्रात धीरज घाटे यांच्याकडे डॉ. घैसास यांच्या रुग्णालय तोडफोडीवरून तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते आहे. दरम्यान मला हे पत्र मेधा कुलकर्णी यांनी मला हे पत्र दिले नसून, माध्यममार्फत मला हे मिळाले असल्याचे धीरज घाटे म्हणाले आहेत. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

हे पत्र मला मेधा कुलकर्णी यांनी दिलेले नाही. मिडियामार्फत ते मला मिळाले आहे. त्यांनी हे पत्र थेट मला द्यायला हवे होते. जे काही म्हणणे असेल ते पक्षाच्या बैठकीत बोलायला हवे होते. पत्राच्या माध्यमातून हे होयला नको होते.

भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू

सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.  दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.

Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, “… ही तर मुघलशाही”

मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाही. सकाळी ९ वाजता आलेली महिला दुपारी दोनपर्यंत त्याच ठिकाणी होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. नंतर महिला अतिरक्तस्त्राव होत असल्याने वाकड येथील एका रुग्णालयात दाखल झाली. त्याठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. परंतु, मोनाली यांचा मृत्यू झाला.

Web Title: Pune bjp internal cold war mp medha kulkarani vs dhiraj ghate abou mangeshkar hospital pregnanat woman case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • BJP
  • deenanath mangeshkar hospital
  • Medha Kulkarni
  • pune news

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
4

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.