
Pune Graduate MLC Election Analysis, MvA Micro Planning Pune
या निकालामुळे उमेदवार निवडीचे राजकारण, पक्षांतर्गत नाराजी आणि विरोधकांची संघटनात्मक ताकद हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. प्रभावशाली आडनाव आणि सत्तेची ताकद असतानाही भाजपचे गणित नेमके कुठे चुकले, हा निकालानंतरचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे.
स्मिता जाधव यांचे काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याशी नातेसंबंध असल्याने कोल्हापुरातील राजकीय समीकरणांचा फायदा मिळेल, अशी भाजपची अपेक्षा असण्याची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत हर्षदा देशमुख-जाधव यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यामुळे वैयक्तिक संबंधांपेक्षा राजकीय बांधिलकी वरचढ ठरल्याचे निकालातून दिसून आले.
हर्षदा देशमुख-जाधव यांना शरद पवारांच्या नेतृत्वाचा तसेच महाविकास आघाडीच्या समन्वयाचा फायदा मिळाला. प्रभाकर देशमुख यांच्या कन्या म्हणून त्यांचे पुणे, सातारा आणि सांगली परिसरातील संपर्कही महत्त्वाचे ठरले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुनील मोदी रिंगणात असूनही मतविभाजनाचा भाजपला अपेक्षित फायदा मिळाला नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मतदारसंघातील स्थानिक समीकरणांचा विचार करून केलेले नियोजन आणि बूथस्तरावरील समन्वय भाजपच्या तुलनेत प्रभावी ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत विस्तारलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात ४७ उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्य लढत स्मिता जाधव आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्यातच झाली, विद्यमान आमदार अरुण लाज यांचे पुत्र शरद लाड तसेच अजित पवार गटाचे नेते भैय्या माने हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती.
अखेर स्मिता जाधव यांना संधी मिळाल्याने स्थानिक इच्छुकांच्या समर्थकामध्ये नाराजी निर्माण झाली का, हा प्रश्न उपस्थित झाला. मैध्या माने यांनी अपक्ष अर्ज दाखल करून नंतर माधार घेतली होती. त्यामुळे इच्छुकांच्या समर्थकांनी प्रत्यक्ष प्रचारात किती सक्रिय सहभाग घेतला, याचे उत्तर भाजपच्या आत्मपरीक्षणातूनच मिलू शकते.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर मतमोजणी प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादासह संघटनात्मक पातळीवरील कारणांचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मतमोजणीदरम्यान काही मतपेट्यांच्या सीलबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे या आक्षेपांची दखल घेऊन संबंधित बाबींची पडताळणी होणे अपेक्षित आहे. मात्र, पराभवाचे विश्लेषण केवळ मतमोजणी प्रक्रियेपुरते मर्यादित ठेवणे योग्य ठरणार नाही.
उमेदवाराची निवड, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी, पक्षातील इच्छुकांची नाराजी आणि कार्यकत्यांचा प्रत्यक्ष सहभाग या बाबींचाही सखोल आढावा घ्यावा लागणार आहे. विशेषतः मतदारसंघातील बूधस्तरावरील यंत्रणा किती प्रभावीपणे कार्यरत होती, मतदारांपर्यंत पक्षाचा संदेश कितपत पोहोचला आणि स्थानिक नेत्यांनी व कार्यकत्यांनी प्रचारात किती सक्रिय भूमिका बजावली.
Ans: २०२० मधील पराभव भरून काढण्यासाठी भाजपने कोल्हापूरच्या प्रभावशाली घराण्याच्या स्मिता जाधव यांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती, जेणेकरून कोल्हापूर पट्ट्यातील राजकीय समीकरणांचा फायदा घेता येईल.
Ans: काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत हर्षदा देशमुख-जाधव यांना पाठिंबा दिला. तसेच मविआचे स्थानिक पातळीवरील अचूक मायक्रो प्लॅनिंग आणि बूथ-स्तरीय समन्वय भाजपच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरला.
Ans: केवळ प्रभावशाली आडनाव किंवा वरवरच्या युक्तीवादापेक्षा पक्षांतर्गत सलोखा, तळागाळातील संघटन आणि सुशिक्षित मतदारांच्या प्रश्नांवर असणारा प्रत्यक्ष संपर्क निवडणुका जिंकण्यासाठी अधिक महत्त्वाचा असतो