
Eknath Shinde, Shiv Sena, BJP, Mahayuti, MLC Elections, Election Results
त्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि भाजपचे नेते एकमेकांवर सडकूर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी नेत्यांना हे आदेश दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘दोस्तीत कुस्ती नको’, असे म्हणत आपल्या पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षांशी समन्वयाने वागण्याचा सल्ला दिला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत निर्माण झालेल्या वाद वाढवू नका, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील नेत्यांना दिले आहेत.
या निवडणुकीच्या निकालांचे महायुती म्हणून आत्मपरिक्षण करून चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, युतीत वित्तुष्ट येणार नाही आणि आपल्या वादाचा फायदा विरोधकांना होणार नाही, याचीही खबरदारी आपणच घ्यायची आहे, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी पक्षातल्या पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या.
Ahilyanagar News: शेवगावमधील वृक्षतोड प्रकरण पेटणार? वन अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी
या निवडणुकीत महायुती म्हणून काम करताना कोणत्या चुका झाल्या, कोणच्या त्रुटी राहिल्या याबाबतचा एक सविस्तर अहवाल एखनाथ शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागितला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत तसेच वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्याबाबत आम्ही सविस्तर चर्चा करू असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तूर्त पक्षाचे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मित्र पक्षावर टीका करू नका, विसंवाद टाळा आणि एकजुटीने पुन्हा कामाला लागा असेही एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.
शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही
Ans: विधान परिषदेच्या ५ पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर (शिंदे गट) युतीधर्म न पाळल्याचा आणि पराभवाला जबाबदार असल्याचा आरोप केल्याने दोन्ही पक्षांत वाद पेटला होता.
Ans: एकनाथ शिंदे यांनी 'दोस्तीत कुस्ती नको' असे सांगत मित्रपक्षांशी समन्वय ठेवण्याचे, सार्वजनिक आरोप-प्रत्यारोप टाळण्याचे आणि महायुतीत वितुष्ट येणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
Ans: एकूण ५ जागांपैकी महायुतीला २ जागांवर समाधान मानावे लागले, तर विरोधी महाविकास आघाडीने ३ जागांवर विजय मिळवला.