
nilesh rande slams navnath ban
सिंधुदुर्ग : राज्याच्या राजकारणात सध्या वेगळेच चित्र दिसू लागले आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील धुसफूस गेल्या अनेक दिवसांपासून दिसत होती. आता विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालानंतर भाजप – शिंदे गटात जोरदार धुमश्चक्री होताना दिसत आहे. निवडणुकीत महायुतीला अपेक्षित निकाल न मिळाल्यामुळे भाजप नेते यांनी शिवसेना शिंदे गटावर तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरदेखील आरोप करत टीकेचा भडीमार केला. शिंदे गटाच्या नेत्यांनीही भाजप नेत्यांना सडेतोड प्रत्युत्तर देताना भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली.
यावरूनच आता शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane) हेदेखील मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता निलेश राणे यांनी नवनाथ बन यांना चांगलंच सुनावलं आहे.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला अपेक्षित निकाल न मिळाल्यामुळे भाजप -शिंदे गटात जोरदार खडाजंगी चालू आहे. अश्यातच, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आपल्या X सोशल मीडिया अकाउंटवरून नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये शिवसेनेकडून अपेक्षित असे सहकार्य मिळाले नाही, असा आरोप करीत शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
यानंतर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आमदार निलेश राणे यांनी आपल्या X अकाउंटवरून “नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती” असे प्रत्युत्तर दिले आहे.
नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं.
तुझी लायकी किती तू बोलतो किती. — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 30, 2026
यावरून आता नवा वाद निर्माण झाला असून भाजप शिंदे सेनेतील वाद संपुष्टात येण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. एकनाथ शिंदे यांनी दोन्ही पक्षातील नेत्यांना आवाहन करत आरोप प्रत्यारोप टाळा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत करा असे आवाहन आधीच केलेले आहे. तरीसुद्धा हा वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आता भाजप आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हा वाद मिटणार कि आणखी चिघळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पदवीधर निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’; आयात उमेदवाराचा डाव फसला
Ans: भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी त्यांना सुनावलं.
Ans: निलेश राणे यांनी X पोस्टमध्ये, 'नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती,' असं म्हटलं.
Ans: विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालानंतर अपेक्षित यश न मिळाल्याने दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.