
Pune Metro Line 3 Launch, Shivajinagar Hinjawadi Metro Route,
पहिली ट्रेन सकाळी ६ वाजता हिंजवडीच्या मान मेट्रो स्टेशनवरून सुटली. प्रवाशांनी ‘गणपती बाप्पा मोरिया’च्या घोषणा देत मेट्रोचे स्वागत केले.पहिल्या दिवशी आयटी कर्मचारी, नोकरदार आणि महिला प्रवाशांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अखेर सुरू! जाणून घ्या मार्ग, तिकीट, वेळापत्रक .
आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास आता काही मिनिटांतच पूर्ण होतो, परंतु मेट्रो सेवेच्या शुभारंभामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजच्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आयटी कर्मचारी कुणाल धांडे यांच्या मते, त्यांना आर.के. लक्ष्मण स्टेशनवरून टीसीएसपर्यंत पोहोचायला फक्त २२ मिनिटे लागली. प्रवाशांनी स्टेशनखालील दुचाकी पार्किंग सुविधा आणि सोयीस्कर तिकीट प्रणालीचेही कौतुक केले.
मेट्रोच्या शुभारंभाने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाही दिलासा मिळाला आहे. रात्री उशिरा कॅब किंवा खाजगी वाहनांनी प्रवास करताना होणारा त्रास आणि सुरक्षेची चिंता या पार्श्वभूमीवर, आता त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
पहिली महिला प्रवासी शिवानी इंद्रे म्हणाल्या की, मी अनेक महिन्यांपासून मेट्रो सेवेची वाट पाहत होते. रात्री कॅबने प्रवास करताना भीती वाटायची, पण मेट्रो सुरू झाल्यापासून प्रवास अधिक सुरक्षित आणि तणावमुक्त झाला आहे.
एचआर व्यावसायिक ज्ञानेश्वरी कांगुडे यांनी सांगितले की, पूर्वी त्यांना पिंपरी-चिंचवड ते बाणेर बसने प्रवास करायला सुमारे दीड तास लागायचा. आता मेट्रोने त्यांचा प्रवास सुमारे ४० मिनिटांत होतो. तर काही प्रवाशांनी तिकिटांचे दर तुलनेने महाग असल्याचे म्हटले आहे आणि नियमित प्रवाशांसाठी मासिक पास सुरू करण्याची मागणी केली आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
पुणे मेट्रो लाईन ३ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सैनी यांनी पहिल्या दिवशी स्वतः मेट्रोने प्रवास केला आणि प्रवाशांकडून अभिप्राय घेतला. त्यांनी याला पुणेकरांसाठी दिवाळीची भेट म्हटले आहे. त्यांनी असेही सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे सध्या बंद असलेली उर्वरित सहा स्थानकेही लवकरच प्रवासी सेवेसाठी पुन्हा उघडण्यात येतील.