Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: अभिमानाची बातमी! देशातील पहिली महिला संचालित मेट्रो पुण्यात; १०० महिला ट्रेन पायलट सज्ज

Pune Metro: पुणे मेट्रोच्या प्रत्येक सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) निर्मितीपासून मंजुरीपर्यंत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2026 | 05:34 PM
DCM sunetra Pawar

DCM sunetra Pawar

Follow Us
Follow Us:
  • पुणे मेट्रो मार्गिका-3 देशातील पहिली 100 टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार
  • मेट्रो मार्गिका-3 चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण 
  • मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स स्थापन
Pune Metro: सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असलेल्या पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेता आधुनिक, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो मार्गिका-3 ही देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) साकारलेली पहिली मेट्रो मार्गिका असून, सुमारे 8 हजार 313 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, ही मार्गिका देशातील पहिली 100 टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार असून, सुमारे 100 महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील 50 टक्के महिला कर्मचारी या मार्गिकेचे संचालन करणार आहेत, हे अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

2018 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेची पायाभरणी झाली होती. टप्पा-2 मधील चार विस्तारित मार्गिकांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, आज त्यांचे भूमिपूजन होत आहे. या 31 किलोमीटर लांबीच्या आणि 28 स्थानकांच्या मार्गिकांसाठी केंद्र सरकारने सुमारे 9 हजार 858 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अखेर सुरू! जाणून घ्या मार्ग, तिकीट, वेळापत्रक आणि सर्व वैशिष्ट्ये

या विस्तारामुळे वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे भाग जोडले जाणार असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे 100 किलोमीटरपेक्षा अधिक होईल. या मार्गावरील आर. के. लक्ष्मण संग्रहालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही स्थानके अनुक्रमे ‘कॉमन मॅन’ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करणारी ठरतील, असा उल्लेख त्यांनी केला.

पुणे मेट्रोच्या प्रत्येक सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) निर्मितीपासून मंजुरीपर्यंत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला.  तसेच जुलै महिन्यात हिंजवडीतील मेट्रो स्थानकांची पाहणी करून कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या 426 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, ही कामे प्रत्यक्षात पूर्ण होण्याकडे पालकमंत्री म्हणून स्वतः बारकाईने लक्ष देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

Pune Metro Line 3: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ३ नोव्हेंबरला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन

Web Title: Pm modi inaugurated pune metro line 3 100 women train pilot working hinjewadi it park tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • metro 3
  • Pune Metro
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?
1

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अखेर सुरू! जाणून घ्या मार्ग, तिकीट, वेळापत्रक आणि सर्व वैशिष्ट्ये
2

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अखेर सुरू! जाणून घ्या मार्ग, तिकीट, वेळापत्रक आणि सर्व वैशिष्ट्ये

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात
3

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात

Sharad Pawar Health Update:  शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी
4

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.