पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी शिवाजीनगर ते मान – हिंजवडी मेट्रो लाईन तीन चे येत्या तीन नोव्हेंबरला उद्घाटन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर मेट्रो लाईन तीन चे उद्घाटन करणार असून या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.
बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात हा उद्घाटन सोहळा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे. त्यानंतर चार नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता पर्यंत दर दिवशी ही मेट्रो लाईन प्रवासासाठी सुरू असणार आहे. अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग हा एकूण 23.2 किलोमीटरचा असून या महामार्गावर एकूण 23 स्टेशन आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात पूर्ण मेट्रो मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात येत असून या मार्गावरील जवळपास 17 मेट्रो स्टेशन पहिल्या टप्प्यात सुरू केले जाणार आहेत. शिवाजीनगर ते हिजवडी मेट्रोला पुणेरी मेट्रो किंवा पिंक मेट्रो असे संबोधले जाणार असून, या मेट्रो लाईन वरील मेट्रोच्या सगळ्या लोको पायलट या महिला असणार आहेत. पुणेरी मेट्रो ही जास्तीत जास्त पर्यावरण पूरक पद्धतीने तयार करण्यात आली असून मेट्रो स्टेशन आणि मेट्रो कार सेटवर सोलर पॅनल लावण्यात आले असून त्या माध्यमातून 7.6 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. मेट्रो ला लागणाऱ्या एकूण शंभर टक्के वीज पैकी 30 टक्के वीज ही सोलर पॅनलच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे. तसेच लवकरच पुणेरी 3 मेट्रोचे तिकीट आणि महा मेट्रोचे तिकीट एकाच ॲपवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर अभिषेक चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.