मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर...
डीजीसीएचा आदेश आणि सेवा बंद
धावपट्टीच्या दुरुस्तीची मागणी
डीजीसीएच्या या कठोर निर्णयामुळे नांदेड विमानतळावर तातडीने दुरुस्तीची कामे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची आहे. नांदेड विमानतळ प्रशासनाने लवकरच दुरुस्तीची कामे हाती घेऊन विमानसेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
प्रवाशांची गैरसोय
ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू होती. पुणे आणि नांदेडदरम्यान प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थी व सामान्य प्रवासी यांना आता रेल्वे अथवा रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. पुणे-नांदेड प्रवासाला विमानाने फक्त दीड तास लागत होता; परंतु आता १०-१२ तासांचा प्रवास करावा लागणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’
विमान वाहतुकीच्या दृष्टीने पक्ष्यांची धडक ही एक गंभीर आणि धोका निर्माण करणारी बाब मानली जाते. अशा घटनांमुळे विमानाचे उड्डाण किंवा लँडिंग अडचणी तर येतात शिवाय विमानाचा अपघात होण्याचीही भीती असते. यामुळे प्रवाशांच्या सेवेवर प्रश्नचिह्न निर्माण होते. ‘डीजीसीए’ ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून २५ पर्यंत देशात सर्वात जास्त पक्ष्याची धडक बसण्याची घटना दिल्ली येथील राजीव गांधी विमानतळावर झाली आहे,तर सर्वात कमी घटना पुणे विमानतळावर घडली आहे.दिल्लीत ४१ तर पुण्यात ११ पक्षी धडकण्याची नोंद झाली आहे.