Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics :”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून आता विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक आवाहनांवर अधिक भर दिला जात असल्याचे दिसते.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 05, 2026 | 04:45 PM
motional appeal to voters for the Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections

motional appeal to voters for the Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून भावनिक आवाहन
  • अजित पवारांच्या निधनानंतर प्रचाराची दिशा बदलली
पुणे : आकाश ढुमेपाटील : पुणे जिल्हा परिषद (Pune News) आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला असून आज शेवटचा दिवस आहे. मात्र राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राजकीय वर्तुळामध्ये शोककळा पसरली आहे. मी कामाचा माणूस आहे, माझ्या कामाच्या जोरावर मत मागतो, हे वाक्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकारणाची खरी ओळख ठरले होते. विकासकामे, प्रशासकीय पकड आणि निर्णयक्षमता याच्या बळावर मतदारांसमोर उभे राहणे, हीच त्यांची कायमची भूमिका होती. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय प्रचाराचे स्वरूप बदलल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून आता विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक आवाहनांवर अधिक भर दिला जात असल्याचे दिसते. “राष्ट्रवादीला एक मत म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली,” असा संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या संवादात, प्रचार साहित्यात आणि गावभेटींमध्ये हा सूर ठळकपणे उमटत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हे देखील वाचा : सुनेत्रा काकीच पक्षाच्या प्रमुख राहतील! पवार कुटुंबियांच्या एकत्रित भेटीनंतर रोहित पवारांचे सूचक विधान

मात्र, हा प्रचाराचा मार्ग खुद्द अजितदादांच्या विचारधारेच्या विरोधात जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भावनिक लाटांवर स्वार होण्यापेक्षा कामगिरीची मांडणी, आकडेवारी आणि ठोस विकासकामे समोर ठेवण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला होता. त्यामुळे त्यांच्या नावाने भावनिक मतदान मागणे हे त्यांच्या राजकीय संस्कारांशी विसंगत असल्याची भावना अनेक जुन्या कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.

पुणे जिल्हा हा नेहमीच मुद्देसूद आणि तुलनात्मक मतदानासाठी ओळखला जातो. सिंचन, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवर आधारित राजकारण येथे प्रभावी ठरले आहे. अशा जिल्ह्यात भावनिक आवाहनांवर आधारित प्रचार कितपत परिणामकारक ठरेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : आपण कशाला मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांनी काढून घेतले अंग

विरोधी पक्षांकडूनही या बदललेल्या प्रचारशैलीवर सूचक टीका होत असून, “कामाचा वारसा सांगणाऱ्यांनी कामाचे तपशील मांडावेत,” अशी मागणी अप्रत्यक्षपणे पुढे येत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेससमोरील नेतृत्वाचा प्रश्न, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे आव्हान आणि निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न या भावनिक प्रचारामागे असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. एकूणच, अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात संवेदनशीलता वाढली असली, तरी कामाच्या राजकारणातून भावनिक आवाहनांकडे झालेला हा कल मतदारांना कितपत पटतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Motional appeal to voters for the pune zilla parishad and panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • ajit pawar
  • pune news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.