Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

सीईटीच्या सर्व अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू असून ६ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सीईटी परीक्षेची अंतिम तारीख संपण्यापूर्वी नोंदणी करावी असे आवाहन सीईटी कक्षानी केले आहे

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2026 | 05:42 PM
CET Exam 2026 Registration last date 6 lakh students registered career marathi news

CET Exam 2026 Registration last date 6 lakh students registered career marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • सीईटी २०२६ च्या प्रवेश नोंदणीस प्रारंभ
  • ६ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली
  • मुदत संपण्यापूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन
सोनाजी गाढवे : पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Exam) यावर्षी १७ विविधपदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी ५ जानेवारी पासून एमपीएड आणि एमएड या दोन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणी पासून २०२६ च्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस प्रारंभ झाला. (Career News)

आजपर्यंत सीईटीच्या सर्व अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू असून ६ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जे विद्यार्थी यावर्षी सीईटी परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी त्या सीईटी परीक्षेची अंतिम तारीख संपण्यापूर्वी नोंदणी करावी असे आवाहन सीईटी कक्षानी केले आहे. मागील वर्षी राज्यातून १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आजपर्यंत एकूण ६ लाख ४ हजार ८३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेला नोंदणी केली तर प्रथमच विद्यार्थ्यांना तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेला दोन संधी देण्यात आली आहे. यानुसार दोन संधी मिळून ही नोंदणी ८ लाख ४५ हजार ७०८ अशी झाली आहे.

हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”

या मिळालेल्या दोन संधीमुळे पीसीएम, पीसीबी आणि एमबीए / एमएमएस या तीन अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या प्रवेश परीक्षेला ४ लाख ५ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर २ लाख ४० हजार ८६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेच्या दोन संधीला पसंती दिली. आजपर्यंतप्रवेश परीक्षेसाठी सर्वात जास्त नोंदणी पीसीएमसीईटीसाठी झाली असून २ लाख ४१ हजार १३५ विद्यार्थ्यांनी प्रथम संधीसाठी नोंदणी केली आहे तर दोन संधीसाठी १ लाख ६८ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पीसीबी सीईटीसाठी प्रथम संधीसाठी १ लाख २६ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असूनदोन संधीसाठी ५५ हाजार ५०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

प्रवेशपरीक्षेच्या दोन संधी

राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या(मेन) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही मिळाव्यात म्हणून यावर्षा पासून एमएच सीईटी पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळेस घेण्याचा निर्णय उच्च व तंत्राशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादापाटील यांनी घेतला. यानुसार पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल-२०२६ मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२६ महिन्यात होणार आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल.

हे देखील वाचा :  ही भित्र्या माणसाची लक्षणे…! कॉंग्रेसच्या चीन घुसखोरीच्या AI व्हिडिओने केले पंतप्रधानांना लक्ष्य

CET नोंदणी विद्यार्थ्यांची संख्या

  • एमएच सीईटी पीसीएम पहिली संधी – २ लाख ४१ हजार १३५
  • एमएच सीईटी पीसीएम दोन संधी – १ लाख ६८ हजार ५९१-
  • एमएच सीईटी पीसीबी पहिली संधी – १ लाख २६ हजार ५७८
  • एमएच सीईटी पीसीबी दोन संधी – ५५ हजार ५०१
  • एमबीए / एमएमएस पहिली संधी – ३७ हजार ९८९
  • एमबीए / एमएमएस दोन संधी – १६ हजार ७७७
  • बीएड- ७५ हजार ५५
  • एलएलबी (३ वर्षीय )- ४९ हजार ९५८
  • एलएलबी ५ वर्षीय – २१ हजार ४५५
  • एमसीए – १८ हजार १९९
  • बी. एचएमसीटी / बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम – १६ हजार ७७
  • नर्सिंग – ९ हजार ३
  • बी. पी. एड. – ३हजार ५६४
  • एम.एड. – २हजार ३५९
  • एम.पी.एड. – १ हजार ७२१
  • बीएड + एम.एड. ( ३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम )- ६९०
  • एएसी – ५४५
  • बी. डिझाईन – ४३७
  • डीपीएन / पीएचएन – ४४
  • एम. एचएमसीटी – ३०
  • एकूण नोंदणी संख्या – ६ लाख ४ हजार ८३९
  • दोन संधी मिळून नोंदणी संख्या – ८ लाख ४५ हजार ७०८

Web Title: Cet exam 2026 registration last date 6 lakh students registered career marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam
  • pune news

संबंधित बातम्या

22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द
1

22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द

पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार…
2

पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार…

Parabhani News : दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी! विद्यार्थ्यांची मोठी संख्या, या तारखेला होणार परीक्षा
3

Parabhani News : दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी! विद्यार्थ्यांची मोठी संख्या, या तारखेला होणार परीक्षा

Maharashtra Weather Alert: “उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या…”; तापमानातल्या चढ उतारावर डॉ. सानप यांचे भाष्य
4

Maharashtra Weather Alert: “उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या…”; तापमानातल्या चढ उतारावर डॉ. सानप यांचे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.