Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार…

बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल, तर पुणे–हैदराबाददरम्यानही जलद व सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 04:27 PM
पुणे जिल्ह्यातील 'हे' ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार...

पुणे जिल्ह्यातील 'हे' ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार...

Follow Us
Follow Us:

बुलेट ट्रेनच्या नकाशावर पुण्याचे महत्त्व वाढणार
हडपसर बनणार पुण्याचे ‘बुलेट ट्रेन हब’
प्रकल्पाचा अंदाजे खर्च ४ हजार कोटी रुपये

पुणे: बुलेट ट्रेनच्या नकाशावर पुण्याचे महत्त्व वाढणार असून, हडपसर परिसराला पुण्याचे बुलेट ट्रेन हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे.  मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या प्रस्तावित उच्चगती रेल्वे मार्गांसाठी हडपसर येथे भव्य स्थानक उभारण्याची योजना असून, या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ४ हजार कोटी रुपये असल्याची माहिती पुढे येत आहे.

केंद्र सरकारच्या हाय-स्पीड रेल्वे धोरणांतर्गत पुण्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने आणि वाहतूक कोंडीचा विचार करता, हडपसर हा पर्याय पुढे आला आहे. पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेला हा परिसर रस्ता, रेल्वे आणि भविष्यातील मेट्रो नेटवर्कशी सहज जोडला जाणार असल्याने येथे बुलेट ट्रेन स्थानक उभारणे अधिक व्यवहार्य ठरत आहे.

या प्रकल्पाअंतर्गत मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हे दोन उच्चगती मार्ग एकत्रितपणे हाताळले जाणार आहेत. दुहेरी ट्रॅक, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा आणि ३०० ते ३५० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्या, अशी या बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये असतील. लोणावळा परिसरातील भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, त्या भागात स्थानक टाळून कामशेत परिसरात थांबा देण्याचा पर्यायही चर्चेत आहे.

Budget 2026: देशात धावणार ७ नवीन बुलेट ट्रेन! मुंबई, पुण्यासह ‘या’ ८ शहरांचा कायापालट होणार; पाहा सरकारचा मेगा प्लॅन

हडपसरमधील बुलेट ट्रेन स्थानकामुळे पुणे शहराच्या पूर्व भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. आयटी पार्क, औद्योगिक वसाहती आणि वाढत्या गृहनिर्माण प्रकल्पांना या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा होणार आहे. तसेच, हिंजवडी परिसरातही स्वतंत्र स्थानक उभारण्याचा विचार सुरू असून, त्यामुळे शहराच्या पूर्व–पश्चिम भागांमध्ये वेगवान दळणवळण उपलब्ध होणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल, तर पुणे–हैदराबाददरम्यानही जलद व सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे. उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळत पुण्याच्या विकासाला नवा वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत

मुंबई ते अहमदाबाद भारतात पहिला बुलेट ट्रेन मार्ग जपानच्या मदतीने निर्माण होत असून लवरच या मार्गावर ट्रेन धावणार आहे. त्यानंतर आता देशभरात बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. कारण भारतात दुसऱ्या बुलेट ट्रेन मार्गाचं काम सुरू झालं असून १५०० किमी फक्त साडे सहा तासांत कापता येणार आहे. दिल्लीहून हावडापर्यंत ही ट्रेन धावणार आहे.

Web Title: Hadapsar pune is bullet train hub mumbai and hyderabad 4 thousand crore project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Bullet Train
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
1

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
2

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
3

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
4

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.