Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द

टॅंकर पलटी झाल्याने द्रुतगती मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 22 तास उलटून गेले तरी वाहतूक पूर्ववत झालेली नाही. अन्न, पाण्याशिवाय प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 05:26 PM
22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द
Follow Us
Follow Us:

द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी 
पुणे-मुंबई जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद 
एसटी महामंडळाचा महत्वाचा निर्णय

पुणे: गेल्या 22 तासांपेक्षा जास्त कालावधीपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आडोशी बोगद्यावाजवळ टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यातच आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. द्रुतगती मार्गावर 22 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे.

टॅंकर पलटी झाल्याने द्रुतगती मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 22 तास उलटून गेले तरी वाहतूक पूर्ववत झालेली नाही. अन्न, पाण्याशिवाय प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. मात्र तरी देखील सरकार गप्प बसून असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मार्गावरून टॅंकर काढण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे समोर आले आहे. आता या सर्व परिस्थितीवर मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्यात आली आहेत.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे १२ तासांनंतरही बंद, कोंडी प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा नवा सल्ला

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मुंबईकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई पुणे एक्सप्रेसवर वाहतूक विस्कळीत झाली आहे.  एसटी महामंडळाच्या अनेक बसेस यामध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 37 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.

तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल.

Web Title: Msrtc buses cancel to pune to mumbai traffic jam on express way passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • MSRTC Bus
  • Mumbai News
  • Mumbai-Pune Highway
  • pune news
  • traffic jam

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.