Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Junnar Congress: जुन्नरमध्ये काँग्रेसध्ये अंतर्गत संघर्ष; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

Junnar Congress: माजी तालुकाध्यक्ष अशोक घोलप यांच्या कार्यकाळात नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला यश मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी अंबर परदेशी यांची नियुक्ती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 11:31 AM
Junnar Congress: जुन्नरमध्ये काँग्रेसध्ये अंतर्गत संघर्ष; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी
Follow Us
Follow Us:
  • अंतर्गत वाद आणि नाराजी दूर करून सर्व गटांना एकत्र बांधण्याचे नवीन तालुकाध्यक्षांपुढे आव्हान.
  • तालुक्यातील काही युवा नेते आणि विविध राजकीय प्रवाहांतील पक्षांतरासाठी उत्सुक नेत्यांना पक्षात आणण्याची संधी.
  • नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ नेटवर्क मजबूत करण्याची गरज.
Junnar Congress: तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. तालुकाध्यक्षपदातील बदलानंतर पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

काही कार्यकत्यांच्या म्हणण्यानुसार नेतृत्वातील बदल हा पक्षाचा अंतर्गत निर्णय असला तरी स्थानिक पातळीवरील कार्यकत्यांना विश्वासात घेऊन तो झाला असता, तर निर्माण झालेला संभ्रम टाळता आला असता. दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेण्याची आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

‘नागरिकांच्या जीवाशी खेळू नका’, डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल, संप मागे

माजी तालुकाध्यक्ष अशोक घोलप यांच्या कार्यकाळात नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला यश मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी अंबर परदेशी यांची नियुक्ती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, नव्या नेतृत्वालाही संघटना उभी करण्यासाठी संधी देण्याची भूमिका पक्षातील दुसरा गट मांडत आहे.

राजकीय समीकरणांमध्ये झाले बदल

विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील काँग्रेसच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल झाले आहेत. काही युवा नेत्यांच्या भूमिकेमुळे आणि बदलत्या राजकीय घडामोडींमुळे संघटनेसमोर नव्या आव्हानांसह नव्या संधीही निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, विविध राजकीय प्रवाहांतील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा असून, पक्ष विस्तारासाठी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात असल्याचेही समजते. मात्र, संघटनेतील समन्वय राखत योग्य वेळी निर्णय घेतले जातील, असे पक्षातील सूत्रांकडून सागितले जाते.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; 

 

जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय हवा

जुन्नरसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात काँग्रेसला पुन्हा बळकट करायचे असेल, तर गटबाजीच्या चर्चाना पूर्णविराम देत जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे गरजेचे आहे. स्थानिक नेतृत्व, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते यांच्यात संवाद वाढल्यास आगामी निवडणुकांमध्ये पक्ष अधिक सक्षमपणे मैदानात उतरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

विश्वास जपण्याचे सर्वात मोठे आव्हान

सध्या कार्यकर्त्यांची प्रमुख अपेक्षा म्हणजे वरिष्ठ नेतृत्वाने जुन्नरमध्ये संघटनात्मक मेळावा घेऊन सर्व गटांशी संवाद साधावा, मतभेद दूर करावेत आणि आगामी निवडणुकांसाठी स्पष्ट दिशा द्यावी. पक्षाची ताकद ही कार्यकत्यांमध्ये असल्याने त्यांचा विश्वास जपणे हेच काँग्रेससमोरील सर्वात मोठे आव्हान आणि तितकीच मोठी संधी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

 

Web Title: Pune news junnar congress leadership change ashok gholap amber pardeshi internal rifts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Congress

संबंधित बातम्या

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
1

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
2

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
3

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप
4

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.