Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ३ कोटी २८ लाख मतदारांबाबत पारदर्शकता नसल्याचा दावा करत त्यांनी मतदारांचा डेटा जाहीर करण्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Sep 22, 2026 | 05:34 PM
Harshwardhan sapkal SIR

Harshwardhan sapkal SIR

Follow Us
Follow Us:
  • SIRच्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
  • ३ कोटी २८ लाख मतदारांबाबतचा डेटा जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी
  • दुष्काळ, शेतकरी आणि पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरूनही सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल
 

Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेवरून काँग्रेसने निवडणूक आयोगाला घेरलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील तब्बल ३ कोटी २८ लाख मतदारांच्या नावांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, हा आकडा आणि त्यामागील निष्कर्ष हे सपकाळ यांनी केलेले आरोप आहेत.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी मतदार यादीतील बदल, SIR प्रक्रिया आणि संशयित मतदारांचा डेटा याबाबत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्याचं सपकाळ यांनी सांगितलं.

“2 कोटींहून अधिक मतदार प्रारूप यादीत समाविष्ट झालेले नाहीत”

सपकाळ यांच्या दाव्यानुसार, विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात सुमारे ९ कोटी ७८ लाख मतदार होते. SIR प्रक्रियेनंतर मोठ्या संख्येने मतदार प्रारूप यादीत दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, SIRनंतर महाराष्ट्राच्या प्रारूप मतदार यादीत ७,७१,६५,५६२ मतदार आहेत, तर २,०६,८८,४८७ मतदार प्रारूप यादीत समाविष्ट झालेले नाहीत. त्यामागे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदींसह विविध कारणं देण्यात आली आहेत.

‘जिभेवर लगाम ठेवा, नाहीतर गाठ काँग्रेसशी आहे!’ बावनकुळेंच्या विधानावर यशोमती ठाकूरांचा घणाघाती पलटवार

३ कोटी २८ लाख मतदारांचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी

याच पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी ३ कोटी २८ लाख मतदारांचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी केली. मतदारसंघ आणि बूथनिहाय माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दावे-हरकतींसाठी दिलेल्या मुदतीवरही काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी मुदत वाढवण्याची मागणी केल्याचं सपकाळ म्हणाले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीवरूनही सरकारवर निशाणा

दरम्यान, सपकाळ यांनी राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवरूनही सरकारवर निशाणा साधला. सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चेवरून भाजपवर दबाव आणि ब्लॅकमेलिंगचे आरोपही सपकाळ यांनी केले. तसेच IIT बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत शैक्षणिक व्यवस्थेतील समस्यांवर सरकारने उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांचे ‘अकांऊट’ हॅक, पोस्ट आणि मेसेजशी माझा काही संबंध नाही …

Web Title: Harshwardhan sapkal sir voter list maharashtra 3 crore 28 lakh allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Congress
  • Election Commision
  • Harshwardhan Sapkal
  • SIR

संबंधित बातम्या

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप
1

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप

‘जिभेवर लगाम ठेवा, नाहीतर गाठ काँग्रेसशी आहे!’ बावनकुळेंच्या विधानावर यशोमती ठाकूरांचा घणाघाती पलटवार
2

‘जिभेवर लगाम ठेवा, नाहीतर गाठ काँग्रेसशी आहे!’ बावनकुळेंच्या विधानावर यशोमती ठाकूरांचा घणाघाती पलटवार

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांचे ‘अकांऊट’ हॅक, पोस्ट आणि मेसेजशी माझा काही संबंध नाही …
3

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांचे ‘अकांऊट’ हॅक, पोस्ट आणि मेसेजशी माझा काही संबंध नाही …

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
4

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.