Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Airport News: शहराच्या विस्तारासोबतच हवाई सुरक्षेची कसरत; पुणे विमानतळ परिसरात बांधकामांच्या एनओसी अर्जात मोठी वाढ

विमानतळ आणि हवाई दलाच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्याची उंची, ठिकाण तसेच विमानांच्या उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गाशी असलेले अंतर यांसह विविध बाबींचा विचार केला जातो. त्यासाठी संबंधित यंत्रणांकडून एनओसी घेणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षांत या प्रमाणपत्रासाठी दाखल होणाऱ्या अर्जामध्ये सातत्याने वाढ झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 10, 2026 | 11:47 AM
Pune Airport Construction NOC Rules, Pune Air Force Station

Pune Airport Construction NOC Rules, Pune Air Force Station

Follow Us
Follow Us:
  • कोविड काळातील संथ विकासकामांनंतरचे सुरुवातीचे अर्ज.
  • विमानतळ परिसरात नागरीकरण व गृहप्रकल्पांचा प्रचंड वेगाने झालेला विस्तार.
  • विमानांच्या ‘फ्लाइट पाथ’मध्ये (Flight Path) अडथळा आणणारे अवैध बांधकाम.
 

Pune Airport News: शहराचा विस्तार विमानतळ आणि हवाई दलाच्या परिसरापर्यंत वेगाने होत असताना विकास आणि हवाई सुरक्षा यांच्यातील समन्वयाचे आव्हान वाढले आहे. विमानतळ परिसरातील बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी (एनओसी) येणाऱ्या अर्जाची संख्या २०२० मधील १ हजार ६२ वरून २०२५ मध्ये १ हजार ४०८ झाली आहे. अधिकृत बांधकामांसोबतच नियमांचे उल्लंघन करून उभारल्या जाणाऱ्या इमारतींमुळे विमानांच्या उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता हवाई दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

विमानतळ आणि हवाई दलाच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्याची उंची, ठिकाण तसेच विमानांच्या उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गाशी असलेले अंतर यांसह विविध बाबींचा विचार केला जातो. त्यासाठी संबंधित यंत्रणांकडून एनओसी घेणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षांत या प्रमाणपत्रासाठी दाखल होणाऱ्या अर्जामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात नागरीकरणाचा वेग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज ठाकरेंच्या ‘तिसऱ्या मुंबई’वरील टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; ‘काय करायचं हे ठरलंय, नियोजनही सुरू’

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (आयसीएओ) विमानतळ आणि हवाई दलाच्या तळांच्या परिसरातील बांधकामांसाठी उंचीच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. विमानांच्या उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत इमारती तसेच विद्यमान इमारतींमध्ये करण्यात येणाऱ्या वाढीव बांधकामांमुळे विमानांच्या मार्गिकेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

ड्रोन, लेझर लाइट…

विमानतळालगतच्या उंच इमारतींचा वापर करून काही ठिकाणी ड्रोन उडविणे किंवा लेझर लाइटचा वापर होण्याची शक्यता असते. ड्रोनमुळे विमानाच्या मार्गांत अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच लेझर लाइट वैमानिकांच्या डोळ्यांवर पडल्यास उड्डाणाच्या वेळी गंभीर घोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हवाई सुरक्षेचा प्रश्न केवळ बांधकामांच्या उंचीपुरता मर्यादित नसून विमानतळाभोवतालच्या संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे.

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! 

‘आयसीए‌ओने विमानतळ आणि हवाई दलाच्या तळाव्या परिसरातील बाधकामासाठी उंचीच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. विमानांच्या उक्षण आणि उतरण्याच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, ह। त्यामागील प्रमुख उद्देश आहे. नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे विमानांच्या टेक-ऑफ’ आणि ‘लडिंग’ मार्गिकेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.

२०२५ मध्ये हवाई दलाकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी १ हजार ४०८ अर्ज दाखल झाले होते. शहराचा विस्तार आणि हवाई सुरक्षेची गरज यामध्ये योग्य समतोल साधणे आगामी काळात महत्वाचे ठरणार आहे.’
अंकुश चव्यण, जनसंपर्क अधिकारी, संरक्षण विभाग

 

 

 

Web Title: Pune newspune airport construction noc applications surge air force safety concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • Pune Airport
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.