Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deenanath Mangeshkar Hospital: तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

ससून प्रशासनाला जे चार प्रश्न पोलिसांनी उपस्थित केलेले होते त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये डॉक्टरांची मेडिकल निगलिजन्सी असल्याचे म्हटले आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 19, 2025 | 09:18 PM
Deenanath Mangeshkar Hospital: तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

Deenanath Mangeshkar Hospital: तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती रुग्ण तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर  106(1) अंतर्गत अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या फेरचौकशी अहवालात त्यांच्या वैद्यकीय हलगर्जीपणाची स्पष्ट नोंद झाली असून, त्यावरून ही कारवाई झाली आहे.

अधिकच्या माहितीनुसार, नुकताच  मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आला आहे. ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉ. घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे. ससुन समितीचा दुसरा अहवालानुसार  डॉ.  घैसास यांच्यावर 106(1) नुसार अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार,’ससून प्रशासनाला जे चार प्रश्न पोलिसांनी उपस्थित केलेले होते त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये डॉक्टरांची मेडिकल निगलिजन्सी असल्याचे म्हटले आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’   तर संभाजी कदम,पोलिस उपायुक्त यांनी दिलेली माहितीनुसार, ससून हॉस्पिटलकडून परत अहवाल मागितला. यानुसार डॉ घैसास यांनी निष्काळजीपण आणि हलगर्जीपणा दाखवला वेळ घालवला त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

बी. जे. मेडिकल कॉलेज याच्या  अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ण चौकशी करून अहवाल दिला होता त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कायदेशीरित्या केला जाईल. ही कारवाई शासन जी आर नुसार करण्यात आली आहे.  डॉ घैसास याचा रोल यात दिसत आहे त्यानुसार कारवाई केली आहे. डॉ घैसास यांच्यावर स्टेटमेंट घेतला जाईल,जबाब घेतला जाईल. त्यानंतर त्याची माहिती दिली जाईल.

दरम्यान, तनिषा भिसे या ७ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना पोटात तीव्र वेदना व उच्च रक्तदाब जाणवू लागल्याने २१ मार्च २०२५ रोजी इंदिरा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी २८ मार्च रोजी त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडे त्यांनी पूर्वी उपचार घेतले असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून तिथे हलविण्यात आले. मात्र, गंभीर अवस्थेत असूनही रुग्णालयात ५ तास ३० मिनिटांपर्यंत कोणतेही तात्काळ उपचार करण्यात आले नाहीत, असा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे.

रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्याऐवजी १० लाख रुपये एनआयसीयू डिपॉझिट भरल्याशिवाय दाखल करून घेतले जाणार नाही, असा अडसर निर्माण करण्यात आल्याचे पीडित कुटुंबाने स्पष्ट केले आहे. या विलंबामुळेच रुग्णाची अवस्था अधिक बिघडली आणि अखेर ३१ मार्च रोजी मणिपाल रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

Pune News: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. घैसासांची ‘ही’ मागणी पोलिसांकडून मान्य

ससून रुग्णालयाने दिलेल्या फेरचौकशी अहवालातही डॉ. घैसास यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णावर वेळेत उपचार झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. परिणामी त्यांच्या मृत्यूला डॉ. घैसास यांची वैद्यकीय निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, संबंधित रुग्णालयावरही चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, मयत रुग्णाच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Pune police case file against dr sushrut ghaisas about tanisha bhise death at deenanath mangeshkar hospital marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • crime news
  • deenanath mangeshkar hospital
  • Pune Police

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
4

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.