Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 13 दुकाने फोडली; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एकाच रात्री तब्बल १३ दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयूर जितेंद्र शिंदे याला तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 15, 2026 | 05:15 PM
शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 13 दुकाने फोडली; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 13 दुकाने फोडली; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

Follow Us
Follow Us:
  • शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
  • एकाच रात्री 13 दुकाने फोडली
  • गुन्हे शाखेकडून एकाला अटक
शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एकाच रात्री तब्बल १३ दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयूर जितेंद्र शिंदे (वय १९, रा. महात्मा फुले नगर, भोसरी, पुणे) याला तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने या चोऱ्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी शिक्रापूर येथील व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी आपापली दुकाने बंद करून घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री ते ८ ऑक्टोबरच्या पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी परिसरातील दुकानांना लक्ष्य केले. पाबळ चौकातील पलांडे मेडिकलसह न्यू साई मेडिकल, जय मल्हार मेडिकल, राजविका मेडिकल, सह्याद्री मेडिकल, श्री स्वामी समर्थ मेडिकल, शांताई मेडिकल, लीलावती मेडिकल, कल्याणी मेडिकल अशा अनेक मेडिकल दुकानांचे कुलूप फोडण्यात आले. याशिवाय वीरा ज्वेलर्स, केक हाईटस शॉप, एसी ज ब्रॅण्ड फॅब्रिक, करंजे गॅस एजन्सी आणि श्री भादरीया इमिटेशन ज्वेलरी या दुकानांमध्येही चोरी करण्यात आली. एकाच रात्री १३ दुकानांना लक्ष्य करण्यात आल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हे सुद्धा वाचा : मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. काही दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये चोरटे कैद झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासातून मयूर शिंदे याच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या पथकाने तळेगाव दाभाडे येथे कारवाई करून मयूर शिंदे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तीन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी तानाजी खुशालराव पलांडे (वय ४७, रा. इनामवस्ती, मुखई, ता. शिरूर) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर तीन साथीदारांचा शोध सुरू असून, चोरीचा मुद्देमाल आणि अन्य बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर करीत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिक्रापूर येथे एका रात्रीत किती दुकानांमध्ये चोरी झाली?

    Ans: शिक्रापूर येथे चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल १३ दुकाने फोडून चोरी केली. यामध्ये मेडिकल, ज्वेलर्स, कपड्यांचे दुकान आणि इतर व्यावसायिक दुकानांचा समावेश होता.

  • Que: चोरीप्रकरणी पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

    Ans: मयूर जितेंद्र शिंदे (वय १९, रा. भोसरी, पुणे) याला पोलिसांनी तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

  • Que: आरोपीने चोरी कोणाच्या मदतीने केल्याची कबुली दिली?

    Ans: मयूर शिंदे याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने १३ दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या साथीदारांचा शोध सुरू आहे.

Web Title: The police have arrested one person in connection with a case of breaking into a shop and committing theft nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ
1

घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ

अतुल बोऱ्हाडे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; पत्नीच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल
2

अतुल बोऱ्हाडे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; पत्नीच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ
3

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ

मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ
4

मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.