पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना अवघे नऊ-दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करत वेगवेगळ्या घोषणाही जाहीर केल्या आहेत. पण आता पुणेकरांनीही जाहीरनामा प्रसिद्ध करत आपल्या मागण्या मांडत राजकीय पक्षांकडे त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
मुलभूत समस्यांच्या आधारे नागरिकांनी नियमित पाणीपुरवठ्याचा अभाव, जीर्ण रस्त्यांची दुरुस्त्या, अतिक्रमण, वाहतूक कोंडीची समस्या, अव्यस्थित ड्रेनेज व्यवस्था, ध्वनिप्रदूषण, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, विकास योजना राबविण्याची गरज अशा मागण्या मांडल्या पुणेकरांनी मांडल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! खासदार धनंजय महाडिकांविरुद्ध गुन्हा दाखल; ‘या’ वक्तव्यानं आणलं अडचणीत
दक्षिण पुण्यातील महंमदवाडी आणि उंड्री येथील नागरिकांनी स्थानिक कल्याण मंचाच्या नेतृत्वाखाली अपुरा पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाहतूक कोंडीची समस्या, कचऱ्याची विल्हेवाट आणि व्यवस्थापन, अतिक्रमण आणि पोलिसांची गस्तीची कमतरता याविषयी नागरिकांनी त्यांच्या दीर्घकालीन तक्रारी मांडत स्वतःचा जाहीरनामा तयार केला आहे.
परिसरातील 60 हून अधिक निवासी ‘सोसायट्यां’मध्ये इतर मूलभूत सुविधा, विशेषत: गेल्या 18 वर्षांहून अधिक काळापासून या भागात पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत उपलब्ध होत नसल्याचा दावा केला आहे. पुणे महानगरपालिकेकडून पाईपद्वारे पाण्याची सोय नसल्यामुळे या ‘सोसायट्यां’ना पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतअसल्याची तक्रारही या जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘व्यापारी नेहमी खोटे बोलतो, भेसळ करतो…’, संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य
उंड्री येथील ‘न्याती चेस्टरफिल्ड’ सोसायटीचे रहिवासी सुनील अय्यर यांनी गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून या भागात राहत आहेत. परंतु मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही लक्षणीय सुधारणा झालेली नाही. याठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे आणि आम्ही नागरी संस्था, आमदार आणि खासदारांसह सर्व प्राधिकरणांशी संपर्क साधला आहे, परंतु यश आले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
हताश होऊन स्थानिक लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचारही केला आणि आपल्या सोसायटीबाहेर ‘पाणी नाही, मत नाही’ असे फलकही लावले, पण आता अखेर त्यांनी जाहीरनाम्याचा मार्ग स्वीकारला. मूलभूत सुविधांअभावी जीवन जगत असताना ते 18 वर्षांपासून महापालिकेला कर भरत आहोत, असे ‘मोहम्मदवाडी-उंद्री रेसिडेंट्स वेल्फेअर डेव्हलपमेंट फाऊंडेशन’चे प्रमुख सदस्य आणि अन्य स्थानिक रहिवासी सुनील कोलोटी यांनी म्हटले आहे,.
आणखी एक रहिवासी, वैदेही सूर्यवंशी म्हणाल्या की, पुरंदर मतदारसंघातील दोन स्थानिक उमेदवारांना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) संभाजी झेंडे आणि शिंदे गटाचे विजय शिवतारे यांना आपला जाहीरनामा दिला होता आणि त्यांना विचारण्यात आले. या मुद्द्यांना प्राधान्य देण्याची विनंती केली आहे. या लोकांनी पुरंदरचे आमदार संजय जगताप (काँग्रेस) यांनाही चर्चेसाठी बोलावले आहे.