Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: येरावड्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात! मैदानावर भंगाराचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष.

विद्यार्थ्यांच्या खेळासाठी आणि व्यायामासाठी महापालिकेच्या माध्यमातून ५० लाख रुपये खर्चून उभारलेले सिमेंट काँक्रिटचे मैदान आज वापराविना पडून आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 11, 2026 | 05:29 PM
Pune News: येरावड्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात! मैदानावर भंगाराचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष.
Follow Us
Follow Us:
  • शालेय मैदानाची दयनीय अवस्था आणि भंगाराचे साम्राज्य
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न
  • ‘फिट इंडिया’ मोहिमेचा फज्जा आणि शैक्षणिक नुकसान
Pune News: येरवडा येथील महानगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मैदानाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मैदानावर भंगार वस्तूंचे साम्राज्य पसरले असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. खेळण्यासाठी जागाच उरली नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​मैदानावर लोखंडी साहित्याचा ढिगारा

​शाळेच्या मुख्य मैदानावर जुने लोखंडी बाके (बेंचेस), तुटलेली कपाटे, गंजलेले पत्रे आणि टाकाऊ शैक्षणिक साहित्याचा मोठा ढिगारा साचला आहे. हे साहित्य अनेक महिन्यांपासून उघड्यावर असल्याने पूर्णपणे गंजले आहे. मुले खेळताना किंवा धावताना या साहित्याला लागून मोठी दुखापत होण्याची, तसेच धनुर्वातासारखा (Tetanus) धोकादायक संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Maharashtra Politics : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग

​’फिट इंडिया’ केवळ कागदावरच?

​एकीकडे सरकार ‘फिट इंडिया’ मोहिमेचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे मनपा शाळेतील मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदानही उपलब्ध नाही. मैदानातील मोठा हिस्सा भंगार साहित्याने व्यापल्यामुळे शारीरिक शिक्षणाचे (PT) तास घेणे अशक्य झाले आहे. मोकळी जागा नसल्याने मुलांना नाईलाजाने वर्गात किंवा अरुंद बोळांमध्ये बसून राहावे लागत आहे.

​प्रशासनाची ढिम्म अवस्था; आंदोलनाचा इशारा

​हे भंगार हटवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार तोंडी तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. ​”आमची मुले शाळेत शिक्षणासाठी जातात की भंगार डेपोत? एखादा मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने हे साहित्य तत्काळ न हटवल्यास मनविसे (वडगाव शेरी) कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विभाग अध्यक्ष कुलदीप घोडके यांनी दिला आहे.

 

विद्यार्थ्यांच्या खेळासाठी आणि व्यायामासाठी महापालिकेच्या माध्यमातून ५० लाख रुपये खर्चून उभारलेले सिमेंट काँक्रिटचे मैदान आज वापराविना पडून आहे. संत ज्ञानेश्वर विद्यालयातील या मैदानासाठी झालेला हा अवाढव्य खर्च लोकप्रतिनिधींचा हट्टीपणा आणि प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे वाया गेल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केला आहे.

Pune BJP Crisis: भाजपची पुण्यात मोठी कारवाई; अमोल बालवडकरांसह ६९ बंडखोर कार्यकर्त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

सन २०२२ मध्ये या मैदानाच्या कॉंक्रिटीकरणासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, कनिष्ठ अभियंत्याने हा निधी दुसऱ्या कामासाठी वळवल्यामुळे या मैदानाचे काम अर्धवटच राहिल्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे, उद्घाटन झाल्यापासून आजतागायत एकाही विद्यार्थ्याला या मैदानावर खेळता आलेले नाही. त्यामुळे ५० लाख रुपये खर्चून नक्की साध्य काय झाले, असा प्रश्न पालक आणि नागरिक विचारत आहेत.

महापालिकेची मुदत संपत असल्याने श्रेयवादासाठी आणि घाईघाईत या अर्धवट कामाचे उद्घाटन उरकण्यात आले, मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.मातीच्या मैदानावर सिमेंट कॉंक्रिटीकरणाचा घाट का घातला गेला? जर खेळाडूंना याचा वापरच करता येत नसेल, तर हा निधी कोणाच्या फायद्यासाठी खर्च केला? असे सवाल मनविसेने उपस्थित केले आहेत. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: Pune news garbage piles up on the grounds of sant dnyaneshwar vidyalaya in yerawada administrations negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Educational News
  • pune news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

Shalarth ID Scam: SIT कडून १६ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; १,१९९ संशयितांचे कनेक्शन!
2

Shalarth ID Scam: SIT कडून १६ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; १,१९९ संशयितांचे कनेक्शन!

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
3

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
4

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.