Pune road changed Hadapsar road closed on sunday as palanquin forwarded towards saswad
पुणे : आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झाली असून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये विसावल्या आहेत. उद्या (दि.22) दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला निघणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातून सकाळी लवकर या पालख्या निघणार असल्यामुळे काही रस्ते हे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत पुणे वाहतूक पोलिसांनी माहिती दिली असून पर्यायी मार्ग देखील सांगितले आहे.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यातून सोमवारी पहाटे यवत मार्गे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे तर व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवकडे मार्गस्थ होत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकीत रविवारी (दि.२२) रात्री ११ पासून बुधवारी (दि. २५) बदल करण्यात आला आहे. पालखी रोटी घाटात जाईपर्यंत थेऊर फाटा येथुन पुढे सोलापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार वाहतूक बंद तसेच वळवली जाणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बंद असलेले मार्ग | पर्यायी मार्ग |
---|---|
संत कबीर चौक ते बेलबाग चौक | संत कबीर चौक- रास्ता पेठ पॉवर हाऊस बेलबाग चौक |
संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक | पॉवर हाऊस-फडके हौद-देवजीबाबा चौक-हमजेखान चौक |
सेव्हन लव्ह चौक ते रामोशी गेट चौक | सेव्हन लव्ह चौक–जेधे चौक |
मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान | वानवडी बाजार चौक-लुल्लानगर चौक- गंगाधाम चौक |
बिशप स्कुल ते मम्मादेवी चौक | बिशपस्कुल-पाण्याची टाकी–काहुन रोड– मोरओढा ब्रिज–घोरपडी |
वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक | वानवडी बाजार चौक शिंदे छत्री-जगताप चौक रामटेकडी-ससाणेनगर |
ट्रायलक चौक, एम.जी रोड ते रामोशी गेट चौक | एम.जी. रोड ते डॉ. आंबेडकर पुतळा चौक बॅनर्जी चौक |
मोरओढा चौक ते भैरोबानाला चौक | सोलापूर बाजुला जाण्यासाठी- घोरपडी गांव रेल्वे गेट- केशवनगर चौक मार्गे किंवा कोरेगांव पार्क जंक्शन नॉर्थ मेन रोड-एबीसी फार्म चौक-केशवनगरमार्गे |
भैरोबानाला ते मम्मादेवी चौक | भैरोबानाला वानवडी बाजार चौक लुल्ला नगर चौक किंवा भैरोबानाला-एम्प्रेस गार्डन रोड मोरओढा |
जांभुळकर चौक ते फातीमा नगर चौक | जांभुळकर चौक-जगताप चौक |
बी.टी. कवडे जंक्शन, काळुबाई जंक्शन, रामटेकडी जंक्शन, वैदुवाडी जंक्शन, जुना कॅनॉल रोड जंक्शन, मगरपट्टा (मुंढवा) जंक्शन, हडपसर वेस जं | पालखी पास होईपर्यंत केवळ अंतर्गत रस्त्यांचा वापर सुरू ठेवण्यात येणार आहे. |
सिरम फाटा जंक्शन ते सोलापूर रोड १५ नंबर फाटा ते सोलापूर रोड | पालखी व दिंड्या पास होताना तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद ठेवून प्रसंगानुरूप सोलापूर रोडला प्रवेश देण्यात येईल. |
मंतरवाडी फाटा ते सासवड खडीमशिन चौक ते बोपदेव घाट | पालखी सासवड येथे मुक्कामाचे ठिकाणी पोहचेपर्यंत कोणतेही वाहन दिवेघाटा कडे / बोपदेव घाटाकडे न सोडता खडी मशिन चौक कात्रज मार्गे वळविण्यात येईल. |
हडपसर ते सोलापूर रोड | मगरपट्टा – खराडी बायपास – वाघोली मार्गे- नगर रोडने इच्छित स्थळी जावे. |
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा