Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Suger Factory Politics: साखर कारखानदारीत १८५ कोटींचा ‘एफआरपी’ घोटाळा; विठ्ठल राजे पवारांचा गंभीर आरोप

शेतकऱ्यांना १८५ कोटी रुपयांपेक्षा जास्त एफआरपी रक्कम देण्यात आलेली नाही. विनापरवाना (परवानगीशिवाय) लाखो मेट्रिक टन उसाचे बेकायदेशीर गाळप करण्यात आले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 27, 2026 | 03:26 PM
Vitthal Raje Pawar, FRP Scam Pune Solapur, Sugar Factory Politics Maharashtra, Karmayogi Sugar Factory,

Vitthal Raje Pawar, FRP Scam Pune Solapur, Sugar Factory Politics Maharashtra, Karmayogi Sugar Factory,

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे-सोलापूरमधील साखर कारखानदारीत १८५ कोटींचा ‘एफआरपी’ घोटाळा
  • शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
  • शेतकऱ्यांना १८५ कोटी रुपयांपेक्षा जास्त एफआरपी रक्कम देण्यात आलेली नाही
Sugar Factory Politics Maharashtra : पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील नामांकित साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूरच्या ओंकार शुगर ग्रुप आणि कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखान्यासह, सोलापूरमधील चंद्रभागा व गोकुळ शुगर कारखान्यांवर एकूण १८५ कोटी रुपयांहून अधिक एफआरपी (FRP) थकबाकी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी दिली.

शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम.एस. फाऊंडेशन आणि शेतकरी संघटना महासंघाने याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संघटनेने पुराव्यासह सादर केलेल्या तक्रारीत खालील धक्कादायक बाबी नमूद केल्या आहेत.

Pune Water Supply: पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट? खडकवासला प्रकल्पातील नियोजनात मोठा बदल

शेतकऱ्यांना १८५ कोटी रुपयांपेक्षा जास्त एफआरपी रक्कम देण्यात आलेली नाही. विनापरवाना (परवानगीशिवाय) लाखो मेट्रिक टन उसाचे बेकायदेशीर गाळप करण्यात आले. शासन आणि साखर आयुक्तालयाला दिशाभूल करणारे बनावट अहवाल सादर करून फसवणूक केली वजन, रिकव्हरी आणि एनडीसी (NCDC) कर्जाच्या विनियोगात मोठी अनियमितता आढळली आहे.असेही त्यांनी नमूद केले.

या घोटाळ्यासाठी हर्षवर्धन पाटील (चेअरमन, इंदापूर कारखाना), बाबू बोत्रे पाटील (ओंकार शुगर ग्रुप), कल्याण काळे आणि दत्ता बी. शिंदे यांना जबाबदार धरण्यात आले असून, त्यांच्यावर IPC ४२० (फसवणूक), ४१९ (बनावट ओळख), आणि १२०(B) (संगनमत) यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

Railway News : पुणे रेल्वे विभागाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका; सात हजारांहून अधिक प्रकरणे नोंद

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही आणि कारखान्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची देणी भागवली गेली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी तीव्र आंदोलन केले जाईल. यामध्ये अन्नधान्य व भाजीपाला पुरवठा बंद करण्यासोबतच ‘सत्याग्रह’ करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

Web Title: Pune sugar factory politics 185 crore frp scam in sugar industry vitthal raje pawar levels serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.