Railway News : पुणे रेल्वे विभागाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका; सात हजारांहून अधिक प्रकरणे नोंद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या कारवाईत आरपीएफ कडून ६,४०७ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली, तर व्यावसायिक विभागाकडून ३४८ जणांवर खटले दाखल करण्यात आले. या संपूर्ण कारवाईतून एकूण ५८ लाख ४८ हजार ३३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कारवाईचे प्रमाण अधिक दिसून आले. मे आणि जून महिन्यांत अनुक्रमे ७७४ आणि ८०५ प्रकरणे नोंदवली गेली, जे या कालावधीतील उच्चांक मानले जात आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांतही सातत्याने कारवाई सुरू ठेवण्यात आली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत अनुक्रमे ३३२ आणि ३०३ प्रकरणे समोर आली, तर १२ मार्च २०२६ पर्यंत ३० प्रकरणांची नोंद झाली आहे.
चौकट
अनधिकृत पिण्याच्या पाण्याच्या विक्रीवरही कारवाई करण्यात आली. एकूण १,६८७ पाण्याच्या बाटल्या, म्हणजेच सुमारे १४० बॉक्स जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक ६२१ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. तसेच प्रवाशांनी फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच अन्न व पिण्याचे पाणी खरेदी करावे असे म्हटले आहे.
| महिना | व्यावसायिक | आरपीएफ | दंड |
|---|---|---|---|
| एप्रिल | ३२ | ५४२ | ४,७०,७७० |
| मे | ८६ | ६८८ | ४,७९,९७० |
| जून | ७६ | ७२९ | ५,१७,७७० |
| जूलै | ५० | ७३८ | ४,८७,४७० |
| ऑगस्ट | ६० | ७०० | ४,९५,७७० |
| सप्टेंबर | २३ | ७४३ | ४,६२,८४० |
| ऑक्टोबर | १०१ | ५३४ | ५,०४,४२० |
| नोव्हेंबर | ८४ | ६६८ | ५,०००,७० |
| डिसेंबर | ४३ | ४७६ | ४,७५,०७० |
| जानेवारी | ५० | २८२ | ४,९९,७७० |
| फेब्रुवारी | १०२ | २८१ | ५,०९,६४ |
| १२ मार्च पर्यत | ०४ | २६ | ४,४४,७७० |
| एकूण प्रकरणे | – | ७,११८ | ५८,४८,३३० |
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






