स्वारगेट बलात्कार प्रकरणातील मोठी अपडेट, आरोपी दत्ता गाडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
पुण्यातील स्वागरगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. स्वागरगेट बस स्थानकात २६ तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला होता. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणा गावचा रहिवासी आहे. घटना घडल्यानंतर तो तीन दिवस फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल तेरा पथकं धाडण्यात आली होती. अखेर त्याच्याच गावातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.
ही घटना घडल्यानंतर आरोपी दत्ता गाडे हा जवळपास तीन दिवस फरार होता. तो या काळात जवळपास तीस ठिकाणी लपला होता. या सर्व ठिकाणी पोलिसांनी आज तपास केला. फरारी असताना तो गावातील 7 व्यक्तींना भेटला होता, त्या व्यक्तीचा पोलिसांनी आज जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये एका ठिकाणी तो गॅरेजमध्ये गेला होता, एका ओळखीच्या व्यक्तीला जेवण मागितले, एका ठिकाणी पाणी पिला असे तो 7 वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटला या सर्व लोकांचे पोलिसांनी आज जबाब नोंदवले आहेत. आरोपी दत्ता गाडेच्या घराची देखील पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे.
दरम्यान ८ दिवसांपूर्वी पोलिसांचा गणवेश घातलेला दत्ता गाडे याचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता हा फोटो रामोजी फिल्म सिटीमधील असल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र ही माहिती खोटी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आज पोलिसांनी जवळपास 150 एकर परिसरात दत्ता गाडे ज्या ज्या ठिकाणी लपला होता त्या त्या ठिकाणी मोबाईलचा शोध घेतला. गुणाट गावातील शेतशिवारात जवळपास 30 वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून दत्ता गाडे लपला होता.दरम्यान कोर्टात दत्ता गाडेच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला होता. मात्र कोर्टाने अखेर त्याच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.