Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune GBS Update: नक्की पाणी प्यायचे कोणते? आधी टँकरच्या पाण्यात दूषितता अन् आता थेट…; जाणून घ्या

पीएमसी प्रशासनाला गेल्या आठवड्यात जीबीएस-प्रभावित भागात दररोज 800 फेऱ्या करणाऱ्या 15 खाजगी पाण्याच्या टँकर सेवा प्रदात्यांकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये बॅक्टेरियाचे दूषित घटक आढळले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2025 | 02:32 PM
Pune GBS Update: नक्की पाणी प्यायचे कोणते? आधी टँकरच्या पाण्यात दूषितता अन् आता थेट…; जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या एकूण रुग्णांची संख्या 163 झाली आहे. विभागाच्या अहवालात म्हटले आहे की, सर्वाधिक प्रकरणे पुण्यातून आली आहेत. तर फक्त आठ रुग्ण शेजारच्या जिल्ह्यांतील आहेत. पुणे जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. प्रामुख्याने हा आजार दुषित पाण्यामुळे होत असल्याचे मानले जात आहे. अशात शहरातील रहिवासी वापरत असलेल्या पाण्याची तपासणी सुरू आहे.

नवीन विलीन झालेल्या गावांच्या पाण्यात, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या पाण्यात दूषितता आढळल्यानंतर आता, कॅन, जार आणि बाटल्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या रिव्हर्स ऑस्मोसिस  प्लांटच्या पाण्यात दुषितता आणि जीवाणू आढळून आल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे. पीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावित क्षेत्रातील 30 पैकी 19 खाजगी आरओ वॉटर प्लांट दूषित पाण्याचे कॅन पुरवत आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत आणि पाणी निर्जंतुक करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे दूषितीकरण टाळण्यासाठी ब्लीचिंग पावडर पुरवली आहे. क्लोरिनेशनवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि आम्ही आता नांदेड आणि किरकटवाडी येथे क्लोरिनेशन प्लांट बसवण्याची योजना आखत आहोत. 30 खाजगी आरओ प्लांट किंवा वॉटर एटीएमपैकी 19 मध्ये कोलिफॉर्म बॅक्टेरिया असल्याचे आढळून आले आणि त्यापैकी 14 मध्ये ई. कोलाय देखील आहे. दूषित पाणी असल्याने ते पिण्यास असुरक्षित आहे.’ या खाजगी आरओ प्लांट्सद्वारे व्यक्ती आणि व्यवसायांना मोठ्या क्षमतेचे पाण्याचे कॅन विकले जातात. प्रामुख्याने कार्यालये, सार्वजनिक मेळाव्याची ठिकाणे आणि लग्नाचे हॉल या ठिकाणी हे पाणी पिण्यास वापरले जाते.

हेही वाचा: गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे आणखी एकाचा मृ्त्यू; आतापर्यंतच्या मृतांची संख्या पाचवर

३० नमुन्यांचे मूल्यांकन
पीएमसी प्रशासनाला गेल्या आठवड्यात जीबीएस-प्रभावित भागात दररोज 800 फेऱ्या करणाऱ्या 15 खाजगी पाण्याच्या टँकर सेवा प्रदात्यांकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये बॅक्टेरियाचे दूषित घटक आढळले. 28 जानेवारी रोजी, पीएमसीने धायरी, सिंहगड रोड, किरकटवाडी, खडकवासला आणि आसपासच्या नांदेड शहराच्या परिसरात आरओ प्लांट, वॉटर एटीएम, पिण्याच्या पाण्याचे जार आणि पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांकडून गोळा केलेल्या 30 नमुन्यांचे मूल्यांकन केले. यामध्ये बॅक्टेरियाचे दूषित प्रमाण स्वीकार्य पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आढळून आले.

गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे आणखी एकाचा मृ्त्यू

गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे झालेल्या आणखी एका मृत्यूमुळे मृतांची संख्या पाचवर पोहचली आहे. तर महाराष्ट्रानंतर आसाममध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे झालेल्या पहिल्या मृत्यूमुळे भीती वाढली आहे. महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे कालपर्यंत चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर जीबीएसमुळे पुण्यात काल पाचवा मृत्यू झाला.  जीबीएसमुळे काल पुण्यात एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर आता राज्य सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.

हेही वाचा: Maharashtra GBS Update: राज्यासाठी धोक्याची घंटा? पुण्यानंतर साताऱ्यात आढळले GBS चे 4 रूग्ण, चिंता वाढली

महाराष्ट्रातील नांदेड गावातील एका ६० वर्षीय वृद्धाचा शनिवारी पहाटे १२:३० वाजता पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. १६ जानेवारीपासून ते रुग्णालयात दाखल होते. पुण्यात जीबीएसच्या प्रकरणांमध्ये सतत होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारपर्यंत आयसीयूमध्ये ४५ रुग्ण दाखल होते, ज्यांची संख्या आता ८३ झाली आहे. व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या १८ वरून २८ झाली आहे. दुसरीकडे, ३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

Web Title: 163 jbs patient in maharashtra contaminated bacteria cans jars and bottles at drinking water plant pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • GBS virus
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.