Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन

राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2026 | 12:09 PM
कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले 'हे' आवाहन

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले 'हे' आवाहन

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पुणे विभागातील २३ हजार ११७ पात्र शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

ही यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतींमध्येही ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची माहिती तपासून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

Mumbai News : गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे, तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. बँकांनी योजनेच्या पोर्टलवर राज्यातील एकूण ३१ लाख १७ हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेद्वारे निश्चित करण्यात आलेल्या १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर १० हजार ११४ कोटी ९० लाख रुपये कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यापैकी ७ ऑगस्ट रोजी ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २८ कोटी ६० लाख रुपये, तर २४ ऑगस्ट रोजी ६ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपये वितरित करण्यात आले.

राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.

तसेच योजनेतील पात्र मृत शेतकरी, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 23117 farmers from pune division in the second loan waiver list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Graduate Election : मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवर आक्षेप! ‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून,’ हर्षवर्धन सपकाळ संतापले
1

Pune Graduate Election : मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवर आक्षेप! ‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून,’ हर्षवर्धन सपकाळ संतापले

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले
2

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले

Crop Loan Waiver Fourth List : मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती
3

Crop Loan Waiver Fourth List : मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

Aane Gram Water Crisis: बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दीड महिन्यापासून बंद; २९ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
4

Aane Gram Water Crisis: बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दीड महिन्यापासून बंद; २९ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.