
शौरेन सोमण हिला टेनिसमध्ये ‘दुहेरी मुकुट’
१७ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित शौरेन सोमणने चौथ्या मानांकित शारंग गवळीचा १३-११, ११-४, ११-६ असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. उपांत्य फेरीत शौरेनने दुसऱ्या मानांकित अनुज फुलसुंदरचा ११-७, ११-७, ८-११, ११-८ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत शारंग गवळीने वरदान कोलतेचा ११-६, ११-८, ११-८ असा पराभव केला.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित दिया शिंदेने अंतिम सामन्यात अहाना गोडबोलेचा ११-९, १०-१२, ९-११, ११-८, ११-८ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत दियाने स्पृहा बोरगावकरचा ११-५, ११-३, ११-३ असा पराभव केला. तर अहाना गोडबोलेने मेधा कोत्राचा ८-११, ११-७, १५-१७, ११-९, ११-७ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.दिया शिंदे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववी इयत्तेत शिकत असून शारदा टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दीपेश अभ्यंकर आणि मकरंद साने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात चौथ्या मानांकित शौरेन सोमणने तिसऱ्या मानांकित निशाद लेलेचा सात गेमपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात ९-११, ११-८, १०-१२, ११-५, ६-११, १३-११, ११-९ असा पराभव करून दुसरे विजेतेपद मिळविले. उपांत्य फेरीत शौरेनने अव्वल मानांकित अनुज फुलसुंदरचा ११-८, ११-७, ११-५ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात निशाद लेलेने स्वरूप भाडळकरचा ११-७, ११-५, ११-७ असा पराभव केला.शौरेन सोमण एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये ईसीएसच्या प्रथम वर्षात शिकत असून एम्स अकादमीत प्रशिक्षक नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
११ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित शगुन गणेशेने दुसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धनचा ५-११, ११-९, ११-७, ११-७ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत शगुनने अद्विती पाटीलचा ११-४, ११-९, ११-६ असा, तर शरण्या पटवर्धनने मायरा शर्माचा ११-२, १२-१०, ११-६ असा पराभव केला.शगुन गणेशे माऊंट लिटेरा स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून चॅम्पियन्स टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक तेहसीन अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
६० वर्षांवरील प्रौढ गटात अव्वल मानांकित रोहिंटन तोडीवालाने प्रदीप गुप्ताचा ११-७, ५-११, ११-७, ९-११, ११-९ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. उपांत्य फेरीत रोहिंटनने रवींद्र कुलकर्णीचा १३-१५, ११-५, ११-४, ६-११, ११-७ असा, तर प्रदीप गुप्ताने हरीश साळवीचा ५-११, ११-९, ७-११, ११-८, ११-६ असा पराभव केला.
Ans: प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्कूलमध्ये जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा सुरू आहे.
Ans: टेनिसमध्ये ‘दुहेरी मुकुट’ शौरेन सोमणला मिळाला आहे.