Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Graduate Election : मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवर आक्षेप! ‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून,’ हर्षवर्धन सपकाळ संतापले

Pune Graduate Election : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर काही मतपेट्यांचे सील तुटलेले असल्याचा दावा करण्यात आल्याने गोंधळ उडाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर आक्षेप घेतला.

  • By विवेक
Updated On: Oct 27, 2026 | 06:40 PM
Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal

Follow Us
Follow Us:
  • पुणे पदवीधर मतमोजणी केंद्रावर गोंधळ
  • हर्षदा देशमुख यांनी उपस्थित केला सीलचा मुद्दा
  • हर्षवर्धन सपकाळांचा निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप
 

Pune Graduate Election : राज्यभरात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सकाळपासूनच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अश्यातच निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर काही मतपेट्यांचे सील तुटलेले असल्याचा दावा करण्यात आला असून मोठा गोंधळ निर्माण झाला. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं?

मंगळवारी, 27 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या केंद्रावर मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच काही मतपेट्यांच्या सीलचा मुद्दा उपस्थित झाला.

Maharashtra MLC Election Results 2026: कोणाचे पारडे जड? बंडखोरी अन् अपक्षांचे सावट; कशी आहेत ५ मतदारसंघांतील राजकीय समीकरणे

महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी आठ मतपेट्यांना सील नसल्याचा दावा करत आक्षेप घेतल्याची माहिती आहे. यानंतर निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला. या गोंधळामुळे काही काळ मतमोजणी प्रक्रिया थांबवावी लागल्याचं सांगितलं जात आहे.

‘हा लोकशाहीचा सरळसरळ खून’; सपकाळांचा संताप

या प्रकरणावर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट ‘X’ वर पोस्ट करत संताप व्यक्त केला. सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटलेले आढळल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे.

ते म्हणाले, “पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मोजणी केंद्रावर ७ ते ८ मतपेट्यांचे सील तुटलेला आढळणे हा लोकशाहीचा सरळसरळ खून आहे. सील नसलेल्या संशयास्पद पेट्या बाजूला ठेवून निष्पक्ष तपासणी करण्याऐवजी, निवडणूक अधिकारी बळजबरीने आणि अरेरावी करत मोजणी रेटून नेत आहेत; प्रतिनिधींना लेखी तक्रार करू न देणे हा प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदार आणि मनमानी कारभार आहे.”

“हा उघडउघड चाललेला सावळागोंधळ महाविकास आघाडी कदापि खपवून घेणार नाही. निवडणूक आयोगाच्या या हुकूमशाही आणि संशयास्पद भूमिकेविरोधात तीव्र संताप उसळला असून, सील तुटलेल्या पेट्यांची तातडीने स्वतंत्र चौकशी करून कारवाई झाली नाही, तर अन्यथा लोकशाहीप्रेमी जनतेच्या रोषाला आणि तीव्र जनक्षोभाला सामोरे जावे लागेल.”

मतपेट्यांच्या सीलसंदर्भातील आरोप गंभीर असले, तरी त्यांची अधिकृत चौकशी आणि पडताळणी होणं आवश्यक आहे. निवडणूक प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देतं आणि तक्रारीची नोंद घेऊन कोणती पावलं उचलतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra MLC Election Result News: विधान परिषदेच्या ५ मतदारसंघांसाठी मतमोजणीला प्रारंभ!; १८२ उमेदवारांचे भवितव्य पणाला

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर काय घडलं?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, 7 ते 8 मतपेट्यांचे सील तुटलेले किंवा नसल्याचा दावा करण्यात आला. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी यावर आक्षेप घेतल्याने मतमोजणी केंद्रावर काही काळ गोंधळ झाला.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी काय मागणी केली?

    Ans: हर्षवर्धन सपकाळ यांनी संशयास्पद मतपेट्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक प्रशासनाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

Web Title: Pune graduate election ballot box seal controversy harshwardhan sapkal vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Harshwardhan Sapkal
  • MLC Election
  • pune news

संबंधित बातम्या

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले
1

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले

Aane Gram Water Crisis: बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दीड महिन्यापासून बंद; २९ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
2

Aane Gram Water Crisis: बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दीड महिन्यापासून बंद; २९ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

सांडपाण्याने बदलली मुळा-मुठेची सूक्ष्मजीवसृष्टी; पावसाळ्यातील प्रवाहानंतरही अस्तित्व पूर्ववत होईना
3

सांडपाण्याने बदलली मुळा-मुठेची सूक्ष्मजीवसृष्टी; पावसाळ्यातील प्रवाहानंतरही अस्तित्व पूर्ववत होईना

हिंजवडी ते शिवाजीनगर ‘मेट्रो लाईन 3’ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार
4

हिंजवडी ते शिवाजीनगर ‘मेट्रो लाईन 3’ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.