Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6.44 कोटींची मोठी वसुली

जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. सी. बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोटार वाहन अपघाताशी संबंधित १९ प्रकरणांमध्ये तडजोड झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2026 | 01:32 PM
बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6 कोटी ४४ लाख ७२ हजार ६२३ रुपयांची वसुली

बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6 कोटी ४४ लाख ७२ हजार ६२३ रुपयांची वसुली

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती न्यायालयात शनिवारी (दि. १२) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखल व दाखलपूर्व अशी एकूण ५६२७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून एकूण ६ कोटी ४४ लाख ७२ हजार ६२३ रुपयांची वसुली करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. सी. बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोटार वाहन अपघाताशी संबंधित १९ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. या प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांना एकूण २ कोटी ५३ लाख ७० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली.

या प्रकरणांमध्ये विमा कंपन्यांच्या वतीने ॲड. संतिकर व ॲड. भोई, तर पक्षकारांच्या वतीने ॲड. अजय खोमणे, ॲड. अक्षय महामुनी, ॲड. अभी देशमुख, ॲड. खांडेकर, ॲड. फुलारी व ॲड. वाघ यांनी काम पाहिले. लोकअदालतीसाठी विविध पॅनेलवर जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. सी. बर्डे, जिल्हा न्यायाधीश-४ एच. ए. वाणी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी. एस. झंवर, चौथे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. एम. पाटील, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. पी. काळे आणि तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. व्ही. देशमुख यांनी कामकाज पाहिले.

बारामती वकील संघटनेच्या सचिव स्नेहा मखरे, खजिनदार हर्षद टिकोटे यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते. तसेच न्यायालयीन कर्मचारी, महावितरण, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, नगरपरिषद व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पुढील राष्ट्रीय लोकअदालत १२ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. जास्तीत जास्त पक्षकारांनी आपली प्रकरणे परस्पर संमतीने व तडजोडीने निकाली काढण्यासाठी लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. सी. बर्डे यांनी केले.

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय ! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

Web Title: 5627 cases disposed of at the baramati lok adalat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • baramati news

संबंधित बातम्या

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
1

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.