Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati: बारामतीत शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना! सहाव्या मजल्यावरून पडून रुग्णाचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Baramati Government Hospital Patient Death: बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ४६ वर्षीय रणजीत शितोळे यांचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 05, 2026 | 09:21 PM
Baramati Government Hospital Patient Death

Baramati Government Hospital Patient Death

Follow Us
Follow Us:
  • बारामती शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेने खळबळ
  • रुग्णालयात उपचार सुरू असतानाच काळाचा घाला
  • सहाव्या मजल्यावरून पडून रुग्णाचा मृत्यू

बारामती : बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेने रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या ४६ वर्षीय रुग्णाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५) दुपारी घडली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली असून, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Baramati)

Washim: तुरीच्या फुलांवर काळ्या अळीचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च

 रुग्णाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

रणजीत दत्तात्रय शितोळे (वय ४६, रा. बेलवाडी, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांना ४ नोव्हेंबर रोजी रक्ताच्या उलट्या आणि फिट्सचा त्रास झाल्याने नातेवाईकांनी बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वैद्यकीय पथकासह मानसोपचारतज्ज्ञ आणि कान-नाक-घसा विभागाचे डॉक्टरही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते.

गुरुवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये असलेल्या खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करताना शितोळे यांचा तोल गेला. त्यांना रोखण्यासाठी तेथील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. ते खाली दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर कोसळले. घटनेनंतर त्यांना तातडीने अपघात विभागात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

सुरक्षेच्या उपाययोजनेवर प्रश्नचिन्ह

रुग्णाची मानसिक स्थिती लक्षात घेऊन नातेवाईकांना रुग्णालयात थांबण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते रुग्णाला सोडून निघून गेल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. असे असले तरी, सहाव्या मजल्यावरील खिडक्यांना पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना होत्या का, रुग्णांच्या हालचालींवर आवश्यक देखरेख ठेवली जात होती का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून या प्रकरणाची वैद्यकीय-कायदेशीर नोंद (एमएलसी) केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, घटनेचा तपास सुरू आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण तपासले जात असून संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदविले जात आहेत.

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? विशेषतः मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र देखरेख, खिडक्या व पॅसेजमधील सुरक्षितता आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. या घटनेच्या सखोल चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारामती रुग्णालयातील रुग्णाच्या मृत्यूची घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडली.

  • Que: मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव काय आहे?

    Ans: रणजीत दत्तात्रय शितोळे (वय ४६, रा. बेलवाडी, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे.

  • Que: रुग्णाचा मृत्यू नेमका कसा झाला?

    Ans: रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरील पॅसेजमधील खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करताना तोल गेल्याने ते दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर कोसळले.

Web Title: Baramati government punyashlok ahilyadevi holkar hospital patient falls from sixth floor death pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 09:21 PM

Topics:  

  • Accident Death
  • baramati news
  • Government Hospital

संबंधित बातम्या

सोमेश्वर कारखान्याने ऊसाला प्रतिटन 4 हजारांची पहिली उचल द्यावी; दिलीप खैरे यांची मागणी
1

सोमेश्वर कारखान्याने ऊसाला प्रतिटन 4 हजारांची पहिली उचल द्यावी; दिलीप खैरे यांची मागणी

Nagpur News :कचरा प्रक्रिया केंद्रात घडला अपघात; ट्रॉमल मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
2

Nagpur News :कचरा प्रक्रिया केंद्रात घडला अपघात; ट्रॉमल मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

इंदापूर, बारामतीसह अनेक भागांत मुसळधार पावसाची हजेरी; पुण्यात तापमानाचा पारा 29 अंशांवर
3

इंदापूर, बारामतीसह अनेक भागांत मुसळधार पावसाची हजेरी; पुण्यात तापमानाचा पारा 29 अंशांवर

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात
4

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.