Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात

Baramati News : बारामतीत मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झाले. सोमवारी सकाळी सातपर्यंत १५८ मिमी पावसाची नोंद झाली. परिस्थितीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

  • By विवेक
Updated On: Nov 02, 2026 | 06:27 PM
Baramati rain

Baramati rain

Follow Us
Follow Us:
  • बारामतीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
  • सुनेत्रा पवारांचा प्रशासनाला फोन, परिस्थितीचा घेतला आढावा
  • पार्थ पवार आणि जय पवार यांच्या प्रशासनाला सूचना
 

बारामती, प्रतिनिधी : बारामती शहरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच नगरपरिषदेच्या यंत्रणेने अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत केली. सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत तब्बल १५८ मिमी पावसाची नोंद झाल्याने शहरातील सखल भाग जलमय झाले होते. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या सूचनांनुसार प्रशासनाने तातडीने हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. (Baramati News)

पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचले. मुख्य भिगवण रस्त्यासह प्रमुख मार्गांवर पाण्याचे लोट आल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. सकाळच्या वेळेत कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा, प्रशासनाला सूचना

पावसाची तीव्रता आणि शहरातील परिस्थितीची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. नगराध्यक्ष सचिन सातव आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत सखल भागांतील पाण्याचा निचरा आणि वाहतूक सुरळीत करण्यावर भर देण्यात आला. पार्थ पवार आणि जय पवार यांनीही आवश्यक सूचना केल्या.

Rain Update: बारामतीसह इंदापूरच्या बहुतांश भागात पावसाने झोडपले, द्राक्ष-डाळिंब बागांवर संकटाचे सावट

नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, नगरसेवक आणि नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाला गती दिली. पाण्याचा निचरा करणे, रस्त्यांवरील अडथळे दूर करणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली. सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक विभागाशी समन्वय साधण्यात आला. परिणामी, अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात यश आले.

अजितदादांच्या कार्यसंस्कृतीचा प्रत्यय

स्वर्गीय अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासोबतच प्रशासनात तत्परता, शिस्त आणि नागरिकांच्या प्रश्नांप्रती बांधिलकीची कार्यसंस्कृती रुजवली. संकटाच्या काळात तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देण्याची हीच परंपरा या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली. मुसळधार पावसाचे मोठे संकट उभे राहिले, तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न करण्यात आले.

एका रात्रीत १५८ मिमी पाऊस, शहरातील सखल भागांत पाणी आणि वाहतुकीसमोर आव्हान असतानाही प्रशासनाने दाखवलेली तत्परता लक्षवेधी ठरली. संकट कितीही मोठे असो, नागरिकांच्या मदतीसाठी बारामतीची यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या कामगिरीतून मिळाला.

मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारामतीत किती पावसाची नोंद झाली?

    Ans: सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत बारामतीत १५८ मिमी पावसाची नोंद झाली.

  • Que: बारामतीतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा कोणी घेतला?

    Ans: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनीही आवश्यक सूचना दिल्या.

  • Que: बारामतीतील रस्त्यांवरील पाणी किती वेळात काढण्यात आलं?

    Ans: नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Baramati news sunetra pawar municipal action vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • baramati news
  • pune news
  • Rain News
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
1

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

Sharad Pawar Health Update:  शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी
2

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी

NCP Politics: राष्ट्रवादीच्या सहा नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; सुनेत्रा पवार-पार्थ पवार अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण
3

NCP Politics: राष्ट्रवादीच्या सहा नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; सुनेत्रा पवार-पार्थ पवार अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण

NCP News : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? सुनेत्रा पवारांना डावलून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट!
4

NCP News : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? सुनेत्रा पवारांना डावलून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.