Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलाठी कार्यालयाच्या फेऱ्यांना आता पूर्णविराम; सातबारावरील ‘ही’ कामे होणार ऑनलाईन

अनोंदणीकृत फेरफार नोंदींसाठी ई-हक्क प्रणालीद्वारेच अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. एखादा खातेदार लेखी अर्ज घेऊन आल्यास त्यालाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास मार्गदर्शन केले जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 11, 2026 | 01:44 PM
प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीची लिंक सुरू करावी; शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात यांची मागणी

प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीची लिंक सुरू करावी; शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात यांची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढविणे अथवा कमी करणे यांसारख्या विविध महसुली कामांसाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. भूमिअभिलेख विभागाने विकसित केलेल्या ‘ई-हक्क’ ऑनलाईन प्रणालीद्वारे नागरिक घरबसल्या अर्ज दाखल करू शकणार आहेत. फेरफार नोंदविण्यासाठी यापूर्वी नागरिकांना तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता.

तलाठी संबंधित फेरफार नोंदवून ती मंजुरीसाठी मंडल अधिकाऱ्यांकडे पाठवत असत. मात्र, काही ठिकाणी फेरफार नोंदविण्यास किंवा मंजुरी देण्यास होणारा विलंब नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होता. नियमांनुसार कोणतीही हरकत अथवा वाद नसल्यास फेरफार व मंजुरीची प्रक्रिया एका महिन्याच्या आत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ई-हक्क प्रणालीचा शंभर टक्के वापर बंधनकारक केला आहे.

अर्जासोबतची कागदपत्रे अपूर्ण असली तरी तलाठ्यांना अर्ज थेट नामंजूर करता येणार नाही. अशा वेळी सातबाऱ्यावर नोंद घेऊन अर्जदाराला आवश्यक कागदपत्रांबाबत लेखी सूचना देत प्रकरण पुढील निर्णयासाठी मंडल अधिकाऱ्यांकडे पाठवावे लागणार आहे. तसेच ऑनलाइन अर्ज अनावश्यकपणे प्रलंबित राहणार नाहीत, याची जबाबदारी महसूल प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.

ई-हक्क प्रणालीचा वापर बंधनकारक

अनोंदणीकृत फेरफार नोंदींसाठी ई-हक्क प्रणालीद्वारेच अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. एखादा खातेदार लेखी अर्ज घेऊन आल्यास त्यालाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास मार्गदर्शन केले जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तहसील कार्यालयांमध्ये स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

वारस नोंदसह अनेक कामे केली जाणार ऑनलाईन

वारस नोंद, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, गहाणखत नोंदविणे, बोजा कमी करणे, ई-करार नोंद, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब व्यवस्थापक नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव बदलणे, हस्तलिखित व संगणकीकृत ७/१२ मधील तफावत किंवा चुका दुरुस्त करणे तसेच मयत कुळाच्या वारसांची नोंद या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ई-हक्क प्रणालीमुळे महसूल विभागाच्या सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येणार असून, नागरिकांचा वेळ, श्रम आणि कार्यालयीन फेऱ्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

Web Title: 712 extract related tasks will now be done online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Government Work
  • pune news

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.