Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला लुटले; व्हॉट्सअ‍ॅपवर ‘तो’ मेसेज आला अन्…

हनी-मनी ट्रॅप प्रकरणाची सुरुवात एका व्हॉट्सअॅप मेसेजने झाली. संशयिताने 'सानवी खुराना' या नावाने फिर्यादी तरुणाशी संपर्क साधला. सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेमाचे आमिष दाखवून तरुणाचा विश्वास संपादन केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2026 | 09:31 AM
गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला तब्बल 53 लाखांना लुटले; व्हॉट्सऍपवर 'तो' मेसेज आला अन्...

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला तब्बल 53 लाखांना लुटले; व्हॉट्सऍपवर 'तो' मेसेज आला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपटाला शोभावा असा गुन्हेगारी कट उघडकीस आला आहे. एका अदृश्य चेहऱ्याने रचलेल्या ‘हनी-मनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकून एका तरुणाला लाखो रुपयांचा चुना लावला आहे. ‘सानवी खुराना’ नावाच्या एका प्रोफाईलने आधी प्रेमाचे नाटक केले आणि नंतर गुंतवणुकीच्या नावाखाली या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हनी-मनी ट्रॅप प्रकरणाची सुरुवात एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजने झाली. संशयिताने ‘सानवी खुराना’ या नावाने फिर्यादी तरुणाशी संपर्क साधला. सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेमाचे आमिष दाखवून तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, सानवीने त्याला एका बनावट क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास भाग पाडले. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास तुला कोट्यवधींचा नफा मिळेल, असे स्वप्न त्याला दाखवण्यात आले. फिर्यादीने सुरुवातीला काही पैसे गुंतवले, तेव्हा त्याला स्क्रीनवर चक्क कोटी रुपयांचा नफा दिसत होता. हा आकडा पाहून तो अधिकच भुलला. मात्र, हा नफा काढण्यासाठी संशयिताने कधी ‘ट्रेडिंग कमिशन’ तर कधी ‘टॅक्स’च्या नावाखाली तरुणाकडून वेळोवेळी पैसे उकळले.

दरम्यान, हा नफा मिळवण्याच्या नादात तरुणाने फायनान्स आणि बँकेच्या विविध खात्यांतून तब्बल ५३ लाख रुपये संशयितांच्या हवाली केले. जेव्हा तरुणाने आपली मूळ रक्कम आणि झालेला नफा परत मागितला, तेव्हा ‘सानवी’चा खरा चेहरा समोर आला. तिने पुन्हा ३४ लाख रुपयांची मागणी केली.

दुसरा मोठा ‘हनी ट्रॅप’ उघड

नाशिकमध्ये ‘हनी-मनी ट्रॅप’चा हा दुसरा मोठा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वीच ‘तानिया शर्मा’ नावाच्या तरुणीने व्यावसायिकाला ४८ लाखांना लुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सानवी खुराणाचे हे ५३ लाखांचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी संबंधित बँक खाते क्रमांक आणि सोशल मीडिया प्रोफाईलविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आभासी नफ्याचे फसवणारे ‘मायाजाल’

तरुणाने पैसे देण्यास नकार देताच, संमतीने शेअर केलेले नग्न फोटो आणि खाजगी व्हिडिओ त्यालाच पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर पैसे दिले नाहीत, तर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करेन आणि तुला संपवून टाकेन, अशी धमकी देण्यात आली.

हेदेखील वाचा : Paper Leak: धक्कादायक! पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर लीक, टेलिग्राम ग्रुपवर तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका व्हायरल; गुन्हा दाखल

Web Title: A man was lured through investment and robbed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

Crime News: मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या
1

Crime News: मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या

डॉक्टर अन् हॉस्पिटल देवदूत नव्हे तर…? 18 वर्षांच्या तरुणाला गमवावा लागला जीव, गंभीर प्रकार काय?
2

डॉक्टर अन् हॉस्पिटल देवदूत नव्हे तर…? 18 वर्षांच्या तरुणाला गमवावा लागला जीव, गंभीर प्रकार काय?

नागरिकांनो.. गोडधोड पदार्थ सुरक्षित आहेत काय? सणाच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट
3

नागरिकांनो.. गोडधोड पदार्थ सुरक्षित आहेत काय? सणाच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट

Crime News: व्यावसायिकाला विश्वास संपादन केला अन् पिकअप ट्रक थेट…
4

Crime News: व्यावसायिकाला विश्वास संपादन केला अन् पिकअप ट्रक थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.